लखनौ :आयपीएलचा 21वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात पंजाब किंग्जने लखनौ सुपर जायंट्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. पंजाब किंग्जने या लीगमधील तिसरा विजय मिळवला आहे. यासह पंजाब फ्रँचायझी पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. पंजाबच्या विजयाचा हिरो ठरलेल्या सिकंदर रझाने 41 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 57 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्टने 34, हरप्रीत सिंगने 22 धावा केल्या आहेत. शाहरुख खान २३ धावा करून नाबाद राहिला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 159 धावा केल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने 19.3 षटकांत 8 विकेट गमावून 161 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने 56 चेंडूत 74 धावांची खेळी केली. काइल मेयर्सने 29, कृणाल पांड्याने 18, मार्कस स्टॉइनिसने 15 धावा केल्या. पंजाबकडून गोलंदाजी करताना सॅम कुरनने 4 षटकांत तीन बळी घेतले. कागिसो रबाडाने 2, सिकंदर रझाने 1 बळी, हरप्रीत ब्रारने 1 बळी, अर्शदीप सिंगने 1 बळी घेतला.
आयपीएल 2023 मध्ये आजचा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होतो आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत 159 धावा केल्या आहेत. लखनौकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 74 धावांचे योगदान दिले.
दोन्ही संघाची प्लेइंग 11 : लखनौ सुपर जायंट्स -केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बदोनी, आवेश खान, युधवीर सिंग चरक, मार्क वुड, रवी बिश्नोई; पंजाब किंग्ज -अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, सिकंदर रझा, सॅम कुरान (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.