महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : लखनौ सुपर जायंट्सचा मुंबई इंडियन्सवर 5 धावांनी विजय - मुंबई इंडियन्स

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी झाला. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 3 गडी गमावून 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 172 धावा केल्या. त्यामुळे लखनौ पाच धावांनी जिंकला

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : May 16, 2023, 7:44 PM IST

Updated : May 17, 2023, 12:07 AM IST

लखनौ : इंडियन प्रीमियर लीगच्या 63व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 3 गडी गमावून 177 धावा केल्या आणि मुंबईसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमावून 172 धावा केल्या. आणि लखनौ सुपर जायंट्सने पाच धावांनी विजय मिळवला.

तर प्ले-ऑफ प्रवेश :सोमवारी सामना जिंकल्यानंतर गुजरात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले असून 14 गुण मिळवले आहेत. आजचा त्यांनी विजय संपादन केला असता तर हा विजय त्यांना १६ गुणांवर घेऊन गेला असता आणि प्ले-ऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला असता. तर लखनौ सुपर जायंट्सला अजूनही प्रतीक्षा करण्याची संधी आहे. हा सामना जिंकूनही तो पात्र ठरणार नाही, पण त्याला १५ गुण मिळतील. पात्र होण्यासाठी त्याला शेवटचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल.

लखनौचा मुंबईविरुद्ध चांगला रेकॉर्ड: मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या एकूण 2 सामन्यांपैकी लखनऊ सुपरजायंट्सने दोन्ही सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सने गेल्या मोसमात खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध सामना खेळले. लखनौने त्यांचे मागील दोन्ही सामने जिंकले आहेत, ज्याचा मुंबईविरुद्ध चांगला रेकॉर्ड आह

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, प्रेरक मांकड, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन - उल - हक, रवी बिश्नोई, स्वप्नील सिंग, मोहसिन खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स -काइल मेयर्स, यश ठाकूर, कृष्णप्पा गौथम, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग चरक

मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11) : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल ; इम्पॅक्ट प्लेअर्स -रमणदीप सिंग, विष्णू विनोद, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय, राघव गोयल

रोहित शर्मा : आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टीकडून काय अपेक्षा ठेवायची हे आम्हाला माहित आहे. हा एक चांगला ट्रॅक दिसत आहे. परंतु तो कसा खेळेल याची खात्री नाही. त्यामुळे आमच्यासमोर धावांचे आव्हान असणे चांगले आहे. आम्ही आव्हानासाठी तयार आहोत. इथे वेगवान गोलंदाजही खूप प्रभावी आहेत. त्यामुळे आम्ही 4 सीमर्स आणि 2 स्पिनर खेळवत आहोत. प्रत्येक मॅच महत्त्वाची असते. आणि विशिष्ट दिवशी कोणीही कोणालाही हरवू शकतो. आमच्या संघात केवळ एक बदल आहे.

कृणाल पंड्या : नाणेफेक हरणे चांगले आहे. आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. आयपीएलमधील प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. आमच्या संघात काही बदल आहेत. नवीन आणि दीपक हुडा संघात आले असून काइल मेयर्स आणि आवेश खान बाहेर गेले आहेत. संघातील प्रत्येकजण खेळण्यासाठी तंदुरुस्त आणि उत्साही आहे.

हेही वाचा :

  1. Dog Bitten To Cricketer : मुंबई इंडियन्स अडणीत, अर्जुन तेंडुलकरला श्वानाने घेतला चावा
  2. Mohammad Kaif On MS Dhoni Retirement : धोनीने शेवटचे आयपीएल असल्याचे दिले संकेत - मोहम्मद कैफ
  3. IPL 2023 : फाफ डू प्लेसिस ठरला 600 धावा पार करणारा पहिला फलंदाज, जाणून घ्या कोणता संघ प्ले-ऑफला जाईल
Last Updated : May 17, 2023, 12:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details