लखनऊ :आयपीएल 2023 मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होता. लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. मात्र पावसामुळे लखनऊच्या पहिल्या डावादरम्यानच सामना रद्द करण्यात आला आहे. लखनऊची टीम 19.2 षटकांनंतर खेळू शकली नाही. 19.2 षटकांत लखनऊने 7 गड्यांच्या मोबदल्यात 125 धावा केल्या होत्या.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग 11) : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षा ; इम्पॅक्ट प्लेअर्स -अंबाती रायुडू, मिच सँटनर, एस सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बदोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पंड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, नवीन - उल - हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स -क्विंटन डी कॉक, दीपक हुड्डा, डॅनियल सॅम्स, यश ठाकूर, प्रेरक मंकड.