कोलकाता: टाटा आयपीएल 2023 चा 68 वा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात ईडन गार्डन्स कोलकाता येथे खेळला गेला. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत होते, पण शर्यतीत कोलकाता लखनौच्या मागे पडला. कोलकाता आणि लखनौ यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाताचा एका धावेने पराभव झाला. दुसरीकडे या सामन्यात विजयाचा झेंडा फडकवत लखनौने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले.
कोलकाता डाव:साखळी फेरीतील त्यांच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने लखनौ सुपरजायंट्सशी सामना केला. कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. लखनौने निकोलस पुरणच्या 58 धावांच्या जोरावर 20 षटकांत 8 गडी गमावून 176 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली. नंतर रिंकू सिंग 33 चेंडूत 67 धावा करून नाबाद राहिला. कोलकाताचा एका धावेने पराभव झाला. लखनौने एकूण 14 सामन्यांतून 17 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले.
लखनौचा डाव: नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 176 धावा केल्या. एलएसजीकडून निकोलस पूरनने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. केकेआरकडून वैभव अरोरा, शार्दुल ठाकूर आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या (कर्णधार), आयुष बदोनी, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन - उल - हक, मोहसिन खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स -काइल मेयर्स, यश ठाकूर, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग चरक, दीपक हुडा.