महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : हैदराबादवर ३४ धावांनी विजय मिळवत गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये - सनरायझर्स हैदराबाद

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना रंगला. त्यात गुजरात टायटन्सने 20 षटकात 9 विकेट गमावून 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 9 गडी गमावून 154 धावा केल्या. अशा प्रकारे गुजरात टायटन्सने 34 धावांनी विजय मिळवला. आणि प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झाला.

Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद

By

Published : May 15, 2023, 7:25 PM IST

Updated : May 16, 2023, 12:11 AM IST

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 62 वा सामना आज खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील या सामन्यात गुजरात टायटन्सने 34 धावांनी विजय मिळवला, त्यामुळे ते प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत. आयपीएलच्या या हंगामात, गुजरात टायटन्स हा पहिल्याच प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ आहे. आधी एकहाती विजय होईल अशी स्थिती निर्माण झाली होती पण हैदराबाद ने शेवटच्या चेंडू पर्यंत धाव फलक हालता ठेवला.

गुजरात टायटन्सची फलंदाजी:वृतिमान साहा (यष्टीरक्षक) 3 चेंडूत शून्य धावांवर बाद झाला. शुभमन गिलने 58 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार लगावत 101 धावा केल्या. साई सुदर्शनने 36 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार लगावत 47 धावा केल्या. हार्दिक पटेल (कर्णधार) 6 चेंडूत 8 धावा, मिलर 5 चेंडूत 7 धावा, राहुल तेवतिया 3 चेंडूत 3 धावा, शनाका 7 चेंडूत 9 धावा ( नाबाद), राशिद खान 1 चेंडूत 0 धावा, नूर अहमद 0 धावा 1 चेंडूत शमी 1 धावा आणि मोहित शर्माने 1 चेंडूत शून्य धावा (नाबाद) केल्या. संघाला 13 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे गुजरात टायटन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या.

शुभमन गिलचे शतक : हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना गुजरातच्या 20 षटकांत 188-9 धावा झाल्या आहेत. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलने आयपीएल मधील स्वत:चे पहिले शतक साजरे केले. त्याने 58 चेंडूत 13 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 101 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 30 धावा देत 5 विकेट घेतल्या.

सनरायझर्स हैदराबादची गोलंदाजी:भुवनेश्वरकुमारने 4 षटकात 30 धावा देत 5 बळी घेतले. मार्को जेन्सनने 4 षटकांत 39 धावा देत 1 बळी घेतला. फारुखने 3 षटकात 31 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. टी नटराजनने 4 षटकात 34 धावा देत 1 बळी घेतला. मार्कराम (कर्णधार) ने 1 षटकात 13 धावा, मार्कंडने 3 षटकात 27 धावा आणि अभिषेक शर्माने 1 षटकात 13 धावा दिल्या.

सनरायझर्स हैदराबाद फलंदाजी : अनमोलप्रीत सिंगने 4 चेंडूत 5 धावा, अभिषेक शर्माने 5 चेंडूत 4 धावा, एडन मार्कराम (कर्णधार) 10 चेंडूत 10 धावा, राहुल त्रिपाठी 2 चेंडूत 1 धाव, हेनरिक कलासेन (यष्टीरक्षक) 44 चेंडूत 64 धावा. चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकार ठोकले सनवीर सिंगने ३६ चेंडूत ७२ धावा, अब्दुल समदने ३६ चेंडूत ४५ धावा, मार्को जेन्सनने ३६ चेंडूत ३७ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने 26 चेंडूत 27 धावा, मयंक मार्कंडने 9 चेंडूत 18 धावा आणि फारुकीने 5 चेंडूत 1 धावा केल्या. संघाला 10 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे 20 षटकांत 9 गडी गमावून 154 धावा झाल्या. गुजरात टायटन्स 34 धावांनी विजयी.

गुजरात टायटन्सची गोलंदाजी :मोहमंद शमीने 4 षटकांत 20 धावा देत 4 बळी घेतले. यश दयालने 4 षटकात 31 धावा देत 1 बळी घेतला. राशिद खानने 4 षटकात 28 धावा दिल्या. मोहित शर्माने 4 षटकात 28 धावा देत 4 बळी घेतले. नूर अहमदने 2.5 षटकांत 35 आणि राहुल तेवतियाने 1.1 षटकांत 7 धावा दिल्या.

गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद ; इम्पॅक्ट प्लेअर्स -यश दयाल, श्रीकर भारत, दर्शन नळकांडे, रविश्रीनिवासन साई किशोर, शिवम मावी

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग 11) : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयंक मार्कंडे, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारूकी, टी. नटराजन ; इम्पॅक्ट प्लेअर्स -अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, अकेल होसेन, मयंक डागर, नितीश रेड्डी

एडन मार्करम : आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. या विकेटवर ओलावा दिसतो आहे. आम्ही आमच्या स्किल्स आणि क्षमतेनुसार चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही खरोखरच चांगले क्रिकेट खेळत आहोत, परंतु जिंकण्यासाठी जे आवश्यक आहे ते पूर्ण करू शकलो नाही. आज रात्री चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न राहील. टीममध्ये ग्लेन फिलिप्सच्या जागी मार्को जॅनसेन आला आहे.

हार्दिक पंड्या : आम्ही खरोखरच चांगले क्रिकेट खेळलो. गुणतालिकेतील स्थान तेवढे महत्त्वाचे नाही. तुम्हाला फक्त चांगले क्रिकेट खेळावे लागेल. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला माहित होते की हे आमच्यासाठी अवघड वर्ष असेल. खेळाडूंनी खडतर परिस्थितीत पुढे येऊन चांगले प्रदर्शन केले आहे. ही एक नवीन विकेट आहे. आम्हालाही आधी क्षेत्ररक्षण करायला आवडले असते. आमच्या संघात काही बदल आहेत. शंकरला काल नेटमध्ये बॉल लागला. त्याच्या जागी साई आला आला. शंकाने पदार्पण केले असून यश दयालही परत आला आहे.

हेही वाचा :

  1. Mohammad Kaif On MS Dhoni Retirement : धोनीने शेवटचे आयपीएल असल्याचे दिले संकेत - मोहम्मद कैफ
  2. IPL 2023 : फाफ डू प्लेसिस ठरला 600 धावा पार करणारा पहिला फलंदाज, जाणून घ्या कोणता संघ प्ले-ऑफला जाईल
  3. Yashasvi Jaiswal Records : 21 वर्षांच्या यशस्वीने एकाच सामन्यात मोडले आयपीएलमधील अनेक विक्रम, जाणून घ्या..
Last Updated : May 16, 2023, 12:11 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details