अहमदाबाद : राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या. या सामन्यात राजस्थानने 4 चेंडू बाकी असताना गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला. राजस्थानचा या स्पर्धेतील हा चौथा विजय आहे. आता राजस्थानचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरलेल्या शिमरन हेटमायरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर गुजरात टायटन्सने आतापर्यंत 3 सामने जिंकले आहेत, त्यामुळे गुणतालिकेत गुजरात तिसऱ्या स्थानावर आहे.
राजस्थान ने असा जिंकला मॅच :मागील सामन्यात पंजाब किंग्जवर रोमहर्षक विजय नोंदवल्यानंतर गुजरात टायटन्सने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना केला. आतापर्यंत, हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील रॉयल्सविरुद्धचे तिन्ही सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 177 धावा केल्या. आणि राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य देण्यात आले. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 19.2 षटकांत 7 गडी गमावून 179 धावा केल्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने ३ विकेट्सने विजय मिळवला.
संजू सॅमसनची तुफानी खेळी : कर्णधार संजू सॅमसनने 32 चेंडूत 60 धावांची तुफानी खेळी केली. शिमरान हेटमायरने 26 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना संदीप शर्माने 2, ट्रेंट बोल्टने 1, झाम्पाने 1, युझवेंद्र चहलने 1 बळी घेतला. गुजरात टायटन्सकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने 34 चेंडूत 45 धावा, डेव्हिड मिलरने 30 चेंडूत 46 धावा, हार्दिक पांड्याने 19 चेंडूत 28 धावा, अभिनव मनोहरने 13 चेंडूत 27 धावा, साई सुदर्शनने 13 चेंडूत 20 धावा केल्या. . गुजरातच्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने 3, राशिद खानने 2, हार्दिक पांड्याने 1, नूर अहमदने 1 बळी घेतला.प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकात 7 गडी गमावून 177 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने 19.2 षटकांत 4 चेंडू राखून 7 गडी गमावून 179 धावा करत सामना जिंकला.
11व्या षटकात चौथा धक्का : 11व्या षटकात गुजरात टायटन्सचा प्रमुख रशीद खानने रायन पॅरागनला 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 5 धावांवर बाद केल्याने राजस्थान रॉयल्सला 11व्या षटकात चौथा धक्का बसला. राजस्थान रॉयल्स 11 षटकांनंतर धावसंख्या (62/4) इतकी होती. 10 षटकांनंतर राजस्थान रॉयल्सची धावसंख्या (53/3) या सामन्यात राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्सपेक्षा खूप मागे पडला. गुजरात टायटन्सचे गोलंदाज राजस्थानच्या फलंदाजांना धावा करण्याची संधी देत नाहीत. 10 षटकांच्या शेवटी, संजू सॅमसन (20) आणि रायन पराग (4) धावा करून क्रीजवर उपस्थित होते. राजस्थान रॉयल्सला आता विजयासाठी 60 चेंडूत 125 धावांची गरज होती.