अहमदाबाद:इंडियन प्रीमियर लीग 2023 चा क्वालिफायरचा दुसरा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स चाआणि गतविजेत्या गुजरात टायटन्स मध्ये झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरात टायटन्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 233 धावा केल्या. ज्यामध्ये सबमिन गिलने आयपीएल सीझनमधील तिसरे शतक झळकावत 129 धावा केल्या.
जीटीची फलंदाजी:वृतिमान साहा (यष्टीरक्षक) याने 16 चेंडूत 3 चौकारांसह 18 धावा केल्या. शुभमन गिलने 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकारांसह 129 धावा केल्या. साई सुदर्शनने 31 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार लगावत 43 धावा केल्या. हार्दिक पांड्याने (कर्णधार) 13 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 28 धावा केल्या. रशीद खानने ४५ चेंडूत ५१ धावा केल्या. संघाला 10 धावा अतिरिक्त मिळाल्या. त्यामुळे गुजरात टायटन्सने 20 षटकांत 3 गडी गमावून 233 धावा केल्या.
एमआयची गोलंदाजी: जेसन बेरेन्डॉर्फने 4 षटकात 28 धावा दिल्या. कॅमेरून ग्रीनने 3 षटकात 35 धावा दिल्या. आकाश मधवालने 4 षटकात 52 धावा देत 1 बळी घेतला. ख्रिस जॉर्डनने 4 षटकात 56 धावा दिल्या. पियुष चावलाने 3 षटकात 45 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. कुमार कार्तिकेयने 2 षटकात 15 धावा दिल्या.
सामनापूर्व स्थिती: मुंबई इंडियन्सने बुधवारी चेन्नईमधील एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपरजायंट्सवर ८१ धावांनी मोठा विजय मिळवला आणि आयपीएल २०२३ हंगामातील क्वालिफायर २ साठी पात्र ठरले. आजच्या सामन्यातील विजेत्या गुजरातचा रविवारी, 28 मे 2023 रोजी IPL 2023 च्या अंतिम फेरीचा सामना 4 वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होईल.
जीटीची सलग दुसरी फायनल: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. अहमदाबादच्या घरच्या मैदानावर त्यांचा सामना बहुचर्चित मुंबई इंडियन्स संघाशी झाला. मात्र, पाच वेळच्या चॅम्पियन मुंबईला हरवत गुजरात टायटन्सने सर्वोत्तम कामगिरी केली.
मुंबई इंडियन्सचा डाव:मुंबई इंडियन्सने पहिल्याच षटकात त्यांची विकेट गमावली. गुजरात टायटन्सचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मुंबई इंडियन्सचा डावखुरा प्रभावशाली खेळाडू नेहल वढेराला पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर वैयक्तिक 4 धावांवर बाद केले. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 8 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला जोश लिटलकडे झेलबाद केले
सहाव्या षटकात तिसरा धक्का : गुजरात टायटन्सचा स्टार फिरकीपटू राशिद खानने तुफानी फलंदाजी करणाऱ्या तिलक वर्माला सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 43 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर क्लीन बोल्ड केले. मुंबई इंडियन्सची पाचवी विकेट 14व्या षटकात पडली. 15 व्या षटकात मुंबईची सहावी विकेट पडली. 7वा खेळाडूही 15व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
तिलक वर्माच्या 14 चेंडूत 43 धावा : मुंबईचा सलामीवीर नेहाल वढेरा 3 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला साहाच्या हाती झेलबाद केले. रोहित शर्मा देखील काही कमाल करू शकला नाही. त्याला 7 चेंडूत 8 धावांवर शमीने लिटलच्या हाती झेलबाद केले. हार्दिक पांड्याचा बॉल कोपऱ्याला लागून कॅमरून ग्रीन रिटायर्ड हर्ट झाला होता. तिलक वर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने अवघ्या 14 चेंडूत 43 धावा ठोकल्या. त्याला राशिद खानने आपल्या फिरकीच्या जादूत फसवून क्लीन बोल्ड केले.
गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी ; इम्पॅक्ट प्लेअर्स -जोशुआ लिटल, श्रीकर भारत, ओडियन स्मिथ, रविश्रीनिवासन साई किशोर, शिवम मावी
मुंबई इंडियन्स (प्लेइंग 11) : ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल ; इम्पॅक्ट प्लेअर्स -रमणदीप सिंग, विष्णू विनोद, नेहल वढेरा, संदीप वॉरियर, राघव गोयल
रोहित शर्मा :आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी थोडी चिकट दिसते. आम्ही खेळपट्टीचा सर्वोत्तम वापर करू शकतो. खेळ सुरू असताना खेळपट्टी चांगली होत जाईल. हे आमच्या दृष्टीने सोईचे आहे. या मोसमात आम्ही धावांचा चांगला पाठलाग केला आहे. यंदाचा संघ वेगळा आहे. आमच्या संघात बरेच नवे चेहरे आहेत. एक संघ म्हणून, आम्ही अशा अनेक परिस्थितींमध्ये आलो आहोत. संघात फक्त एक बदल आहे. शौकीनच्या जागी कुमार कार्तिकेय येतो आहे.
हार्दिक पांड्या : आम्हीही गोलंदाजी केली असती, पण ठीक आहे. नॉकआउट्स आणि क्वालिफायर दर्जेदार आहेत. तुम्हाला तुमचे सर्वोत्तम देणे आवश्यक आहे. तसेच मॅचचा आनंद घेणेही महत्वाचे आहे. जर आम्ही आमचे सर्वोत्कृष्ट देऊ शकलो, तर निकालाची पर्वा न करता आम्ही समाधानी राहू. मला माहित आहे की घरच्या मैदानावर लोक आम्हाला कसा पाठिंबा देतील. आच्या संघात दोन बदल आहेत. जोश लिटल आणि साई सुदर्शन, शनाका आणि नळकांडेच्या जागी येत आहेत.
हेही वाचा :
- MI vs LSG Eliminator: मुंबईचा लखनऊवर ८१ धावांनी दणदणीत विजय, आकाशच्या गोलंदाजीपुढे लखनऊचे नबाब ढेर
- IPL 2023 : मॅच हारल्यानंतर पंड्याने केले धोनीचे अभिनंदन ; म्हणाला, 'फायनलमध्ये..'
- IPL 2023 : चेन्नई एक्सप्रेस सुसाट . . . चेन्नई सुपर किंग्ज संघाने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवून गाठली अंतिम फेरी