चेन्नई : IPL 2023 चा पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 172-7 धावा केल्या आहेत.
गुजरात टायटन्स (प्लेइंग 11) : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी ; इम्पॅक्ट प्लअर्स -विजय शंकर, श्रीकर भरत, साई सुदर्शन, जयंत यादव, शिवम मावी.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग 11) : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा ; इम्पॅक्ट प्लअर्स -मथीशा पाथीराना, मिचेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग.
हार्दिक पंड्या : आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आम्हाला वाटते की आज मैदानावर दव येईल, म्हणून आम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. टॉप - 2 मध्ये प्रवेश निश्चित झाल्यानंतर आम्ही आराम करू शकलो असतो, पण आम्हाला लक्ष केंद्रित करून चांगले क्रिकेट खेळायचे होते. आमचा संघ हुशार आहे, आम्ही केवळ एकाच मार्गाने खेळत नाही. आम्ही विकेटमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची खात्री करतो आणि परिस्थितीशी जुळवून घेतो. संघात यश दयालच्या जागी दर्शन नळकांडे येतो आहे.
महेंद्रसिंह धोनी : आम्हालाही प्रथम गोलंदाजी करायची होती. त्यांचा संघ धावांचा पाठलाग करण्यात पटाईत आहे. स्पर्धेत आम्ही परिस्थितीचा थोडा चांगला फायदा घेतला आहे. खेळाडूंनीही वातावरणाशी चांगले जुळवून घेतले आहे. अशा स्पर्धांमध्ये आत्मविश्वासाची पातळी उच्च असावी. आम्ही ते करू शकलो आणि म्हणूनच आम्ही चांगली कामगिरी केली आहे. शेवटच्या मॅचमध्ये भरपूर दव पडले होते, परंतु आजूबाजूला वाऱ्याची झुळूक असल्याने आम्ही आज रात्री याबद्दल सांगू शकत नाही. आम्ही त्याच संघासह खेळत आहोत.
हेही वाचा :
- Virat Kohli Century Record : विराटने आयपीएलमध्ये ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडून रचला इतिहास
- IPL 2023 : गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचा 6 विकेटने पराभव केला
- IPL 2023 : मुंबईचा हैदराबादवर 8 गडी राखून विजय, कॅमेरून ग्रीनने ठोकले टी-20 मधील पहिले शतक