नवी दिल्ली : गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 7 व्या सामन्यात 6 गडी राखून दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विजय मिळवला आहे. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना गुजरातला 163 धावांचे लक्ष्य दिले होते. साई सूर्दशन आणि डेव्हिड मिलर यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर गुजराजने 18.1 षटकांत 11 चेंडूत 4 गडी गमावून आपले लक्ष्य अगदी सहज गाठले. याशिवाय विजय शंकरनेही गुजरातला मजबूत धावसंख्या गाठण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सई आणि विजयचा एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. यामध्ये दोन्ही खेळाडू मॅच विनिंग पॉइंटबद्दल बोलताना दिसत आहेत.
गुजरातने हरलेला सामना कसा जिंकला ? :इंडियन प्रीमियर लीगने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये गुजराजसाठी मॅचविनिंग इनिंग खेळणारे साई सुदर्शन आणि विजय शंकर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. हे दोन्ही खेळाडू सांगत आहेत की, हार्दिक पंड्याच्या गुजरातने हरलेला सामना कसा जिंकला. गुजरात टायटन्सचे फलंदाज जेव्हा लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा दिल्लीचे गोलंदाज त्यांच्यावर वर्चस्व गाजवताना दिसले. या सामन्यात स्टार फलंदाज शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्यालाही काही आश्चर्यकारक करता आले नाही. शुभमनने 13 चेंडूत 14 तर हार्दिकने 4 चेंडूत 5 धावा केल्या. त्यामुळे गुजरातला विजयाची अपेक्षा नव्हती.