मोहाली : गुजरात टायटन्स संघाने पंजाब किंग्ज विरुद्धचा हा सामना ६ विकेट्सने जिंकला. हा या मोसमातील गुजरात टायटन्सचा तिसरा विजय आहे. शुभमन गिलने या सामन्यात गुजरात संघासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये मोहित शर्माचे उत्कृष्ट पुनरागमन झाले. शुभमन गिलच्या 49 चेंडूत 67 धावा जोरावर गुजरात टायटन्सने गुरु पंजाब किंग्जवर सहाकेट्सने विजय मिळवला. पंजाबच्या फलंदाजांना गुरूवारी झालेल्या सामन्यात विशेष कामगिरी करता आली नाही.
पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव :पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन, भानुका राजपाक्षे हे काही खास कामगिरी करू शकले नाहीत. पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या. गुजरातकडून मोहित शर्माने दोन बळी घेतले. इतर गोलंदाजांना त्यावेळी प्रत्येकी एक विकेट मिळाली. आयपीएलच्या १६ व्या मोसमातील १८व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून पराभव केला. गुजरातचा शुभमन गिल १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. लक्ष्य पूर्ण करताना त्याने अर्धशतकी खेळी केली. गुजरात संघाने या सामन्यात १९.५ षटकांत लक्ष्य गाठले आहे.