अहमदाबाद :गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुभमन गिल सध्या त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या मोसमात त्याने 4 शतक व 3 अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक धावा केल्या असून तो ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. आजच्या सामन्यात देखील तो अनेक विक्रमांना गवसणी घालू शकतो.
विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडू शकतो : आयपीएलच्या या मोसमात शुभमनने 16 डावांमध्ये 60.79 ची सरासरी आणि 156.43 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 851 धावा केल्या आहेत. यासह तो आयपीएलच्या एका मोसमात 800 पेक्षा अधिक धावा करणारा विराट कोहलीनंतर केवळ दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. आयपीयएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने 2016 मध्ये 4 शतकांच्या मदतीने 973 धावा केल्या होत्या. आज शुभमनला कोहलीचा हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला आणखी 123 धावांची आवश्यकता आहे.
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
फलंदाज | टीम | धावा | सामने | वर्ष |
विराट कोहली | रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू | 973 | 16 | 2016 |
जोस बटलर | राजस्थान रॉयल्स | 863 | 17 | 2022 |
शुभमन गिल | गुजरात टायटन्स | 851* | 16 | 2023 |
डेव्हिड वॉर्नर | सनरायझर्स हैदराबाद | 848 | 17 | 2016 |