चेन्नई : IPL 2023 चा एलिमिनेटर सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईच्य संघाने जबरदस्त खेळ करत लखनऊच्या संघाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईच्या पलटणने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 8 गडी गमावत 182 धावा करत लखनऊ संघासमोर 183 धावांचे आव्हान दिले. लखनऊकडून नवीन-उल-हकने धारदार गोलंदाजी केली. त्याने 4 षटकांत 38 धावा देत 4 बळी घेतले. यश ठाकूरने 4 षटकांत 34 धावा देत 3 विकेट घेतल्या. मुंबईचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेला लखनऊचा संघ केवळ १०१ धावाच करू शकला. या पराभवामुळे लखनऊचा आयपीएल 2023 मधील प्रवास संपला. विशेष म्हणजे मुंबईच्या संघाला लखनऊने तीन वेळा पराभूत केले होते. मुंबईकडून गोलंदाजी करतानाआकाश मढवालने शानदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. आकाशने1.42 च्या स्ट्राइक रेटने 3.3 षटकात केवळ 5 धावा देत सर्वाधिक 5 बळी घेतले.
लखनऊने ३२ धावांत गमावले ७ गडी : मुंबईचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेला लखनऊचा संघ १६.३ षटकात १०१ धावा करत ऑल ऑऊट झाला. संघाचे दोन्ही सलामीवीर २५ धावांवर बाद झाले होते. इम्पॅक्ट खेळाडू काईल मेयर्स १८ धावा आणि प्रेरक मांकड ३ धावा करून बाद झाला. तर क्रुणाल पांड्याही मोठी खेळी न करता तंबूत परतला. यानंतर आयुष बदोनीलाही संघासाठी मोठी खेळी करता आली नाही. निकोलस पूरन गोल्डन डक बनला. लखनऊकडून धडाकेबाज खेळी करणारा मार्कस स्टॉयनिसने 27 चेंडूमध्ये सर्वाधिक 40 धावा केल्या. पण धाव बाद झाल्याने स्टॉयनिसला अर्धशतक करता आले नाही. यानंतर कृष्णप्पा गौतमही धावबाद झाला. रवी बिश्नोईही कमाल दाखवू शकला नाही. दीपक हुडाही धावबाद झाला. एका षटकाराच्या मदतीने त्याने १३ चेंडूत १५ धावा केल्या. यानंतर लखनऊच्या विकेट्स ठराविक अंतरानंतर विकेट्स पडत राहिल्या.
रोहित शर्मा अपयशी : मुंबईकडून कॅमरून ग्रीनने 23 चेंडूत सर्वाधिक 41 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 1 षटकार हाणला. त्याला नवीन-उल-हकने बोल्ड केले. सलामीवीर ईशान किशनने 12 चेंडूत 15 धावा केल्या. त्याला यश ठाकूरने पूरनच्या हाती घेलबाद केले. कर्णधार रोहित शर्माही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला 11 धावांवर नवीन उल हकने आयुष बदोनीच्या हाती घेलबाद केले. या सामन्यात पराभूत होणारा संघ आयपीएलमधून बाहेर होईल, तर विजेता संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी क्वालिफायर-2 मध्ये गुजरात टायटन्सशी भिडेल.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग 11) : आयुष बदोनी, दीपक हुडा, प्रेरक मंकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पंड्या (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन - उल - हक, यश ठाकूर, मोहसिन खान ; इम्पॅक्ट प्लेअर्स -काइल मेयर्स, डॅनियल सॅम्स, युधवीर सिंग, स्वप्नील सिंग, अमित मिश्रा.