नवी दिल्ली: टाटा आयपीएल 2023 चा 40 वा सामना अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या मोसमात दोन्ही संघांची निराशा झाली आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानावर आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे मागील दोन्ही सामने जिंकले आहेत.
फिल सॉल्ट ५९ धावांवर बाद: दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नरची विकेट गमावली. मात्र, त्यानंतर मार्श आणि सॉल्टने दिल्ली कॅपिटल्सची धुरा सांभाळली. 5 षटकांच्या शेवटी, फिलिप सॉल्ट (26) आणि मिचेल मार्श (19) धावा केल्यानंतर क्रीजवर होते.
197 धावांचे लक्ष्य:नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 197 धावांची मोठी धावसंख्या उभारली. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ६७ धावा केल्या, तर हेन्रिक क्लासेननेही नाबाद ५३ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४ बळी घेतले.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन) :डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्किया, इशांत शर्मा, मुकेश कुमार ;इम्पॅक्ट खेळाडू - सरफराज खान, ललित यादव, अभिषेक पोरेल, खलील अहमद, प्रवीण दुबे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन) :हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, अब्दुल समद, अकील हुसैन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक ;इम्पॅक्ट खेळाडू - मार्को यानसन, विव्रत शर्मा, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, नटराजन.
एडन मार्करम : आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. विकेट कोरडी आहे. आज रात्री जास्त दव पडणार नाही अशी आशा आहे. आम्ही चांगली फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. आमचे सर्व प्रयोग करून झाले आहेत. आता परिणाम मिळण्याची वेळ आली आहे. आमची स्वतःला व्यक्त करण्याची आणि खेळाचा आनंद घेण्याची वेळ आली आहे. वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आहे. हे आमच्यासाठी मोठे नुकसान आहे. परंतु दुसऱ्यांसाठी ही एक संधी आहे. आमच्या फलंदाजांनी अद्याप निराश केले आहे. आमचा संघ समतोल नाही आणि आम्ही चांगली धावसंख्या उभारली नाही. आज अकील हुसैन पदार्पण करतो आहे. तसेच अब्दुल समद देखील संघात परत येतो आहे असे एडन ने सुरवातीला सांगितले होते.
डेव्हिड वॉर्नर : परिस्थितीशी जुळवून घेणे महत्वाचे आहे. आम्ही एका क्लस्टरमध्ये विकेट गमावत आहोत. आम्हाला चांगली फलंदाजी करण्याची गरज आहे. तसेच पहिल्या सहा षटकांमध्ये आम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागली. होम आणि अवे (गेम) हे थोडे आव्हानात्मक आहे, परंतु आम्ही त्याचा आनंद घेत आहोत. प्रियम गर्गचे पदार्पण होत असून अमन खान बाहेर गेला आहे. असे डेव्हिडने म्हणले होते.
हेही वाचा :IPL 2023 : वृद्धीमान साहा 10 धावा करून बाद, गिल-पंड्या क्रिजवर