आजच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला. बंगळुरूने दिलेले 182 धावांचे लक्ष दिल्लीने 16.4 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात गाठले.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
By
Published : May 6, 2023, 7:57 PM IST
|
Updated : May 6, 2023, 11:05 PM IST
नवी दिल्ली :आयपीएल 2023 मधील आजच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर रॉयल चॅलेंजर्सबंगळुरूचे आव्हान होते.दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 गडी राखून पराभव केला.
फिलिप सॉल्टची तुफानी खेळी : दिल्लीकडून फिलिप सॉल्टने 45 चेंडूत धमाकेदार 87 धावा केल्या. त्याला रिली रोसोने 22 चेंडूत 35 धावा करत त्याला चांगली साथ दिली. आरसीबीकडून हेजलवूड, कर्ण शर्मा आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
कोहली-लोमरोरचे अर्धशतक : बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. बंगळुरूकडून विराट कोहलीने 46 चेंडूत सर्वाधिक 55 धावा केल्या. लोमरोरने 29 चेंडूत 54 धावा केल्या. दिल्लीकडून मार्शने 2 विकेट घेतल्या.
फाफ डु प्लेसिस : आम्ही आधी फलंदाजी करणार आहोत. विकेट कोरडी दिसते. आशा आहे की आज रात्री दव पडणार नाही. T 20 क्रिकेटमध्ये मुमेंटमला फार महत्व आहे. आम्हाला परिस्थितीचे आकलन करून चांगली धावसंख्या उभी करायची आहे. आमचे बरेच सामने अद्याप बाकी आहेत. आमच्यासाठी ही समस्या नाही. या नवीन इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे तुम्ही थोडे लवचिक होऊ शकता. आमच्या अव्वल चार फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आहे. तसेच आम्ही बऱ्याच धावा केल्या आहेत. केदार जाधवचा संघात समावेश झाला आहे.
डेव्हिड वॉर्नर : आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. आम्ही येथे खूप ऊर्जा, उत्कटता आणि विश्वास घेऊन येत आहोत. आपण जिथे आहोत तिथूनच आपण चांगले होऊ शकतो. खेळाचे सर्व पैलू, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, आम्हाला प्रत्येक गोष्टीत चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. आज पाऊस पडला, त्यामुळे कदाचित दव नसेल. मायदेशी गेलेल्या अॅनरिक नॉर्कियाच्या जागी मुकेश कुमार संघात आला असून मिश मार्शचाही संघात समावेश झाला आहे.