महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : थरारक सामन्यात पंजाबचा चेन्नईवर 4 गडी राखून विजय - पंजाब किंग्ज

आयपीएलच्या आजच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर चित्तथरारक विजय मिळवला आहे. चेन्नईने दिलेले 201 धावांचे आव्हान पंजाबने शेवटच्या चेंडूवर 4 गडी राखून गाठले.

Chennai Super Kings vs Punjab Kings
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज

By

Published : Apr 30, 2023, 3:31 PM IST

Updated : Apr 30, 2023, 7:34 PM IST

चेन्नई :आयपीएल 2023 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्जच्या संघासमोर पंजाब किंग्जचे आव्हान होते. हा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झाला. या सामन्यात पंजाबने चेन्नईचा 4 गडी राखून पराभव केला आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. प्रत्युतरात पंजाबने 201 धावांचे आव्हान शेवटच्या चेंडूवर गाठले.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) :ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश तीक्षा ; इम्पॅक्ट प्लेअर - आकाश सिंग, ड्वेन प्रिटोरियस, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, आर. एस. हंगरगेकर.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : अथर्व तायडे, शिखर धवन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग ; इम्पॅक्ट प्लेअर - प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, ऋषी धवन, मोहित राठी, शिवम सिंग.

महेंद्रसिंह धोनी : आम्ही प्रथम फलंदाजी करू. ही एक चांगली विकेट आहे. जेव्हा तुमची दुपारची मॅच असते तेव्हा उष्णता हा एक फॅक्टर असतो. दिवसाच्या खेळात वेगवान गोलंदाजांना थोडी विश्रांती मिळू शकते. काही खेळाडू खूप लवकर थकतात. त्यासाठी थोडी हुशारी दाखवणे महत्त्वाचे आहे. उन्हात खूप वेळ राहू नये. आयपीएल ही दीर्घ स्पर्धा आहे. आम्हाला असेही गेम खेळावे लागतील जे तुमच्या अनुषंगाने जाणार नाहीत. मात्र यातून शिकणे महत्वाचे आहे. आजच्या सामन्यासाठी आमची सेम टीम आहे.

शिखर धवन : आम्हालाही प्रथम फलंदाजी करायला आवडले असते. हा दिवसाचा खेळ आहे आणि विकेट कोरडी आहे. तिथे दव पडणार नाही. ही एक नवीन नवीन सुरुवात आहे. आम्ही भूतकाळातील गेममधून शिकत राहतो आणि चांगले करण्याचा प्रयत्न करतो. शेवटचा सामन्यात मी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला मात्र ते काही वर्कआऊट झाले नाही. मात्र आम्ही सकारात्मक मानसिकतेने पुढे जाणार आहोत. जाईल. हरप्रीतची संघात वापसी झाली आहे.

हेही वाचा :Vijay Shankar Fifty in IPL 2023 : गुजरातने 'असा' घेतला ऐतिहासिक पराभवाचा बदला, विजय शंकरने झळकावले अर्धशतक

Last Updated : Apr 30, 2023, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details