हैदराबाद : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लीग स्टेज मधील शेवटचा सामना रविवारी (22 मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज ( Sunrisers Hyderabad vs Punjab Kings ) संघात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने हैदराबाद संघावर विजय मिळवला. या सामन्याने लीग स्टेज मधील सामन्यांची सांगता झाली. आता आयपीएल 2022 चा हंगाम शेवटच्या आठवड्यात येवून पोहचला आहे.
आयपीएल 15 व्या हंगामात प्लेऑफमध्ये खेळण्यासाठी चार संघाची नावे स्पष्ट झाली आहेत. ज्यामधे अनुक्रमे गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) , राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) , लखनौ सुपरजायंट्स ( Lucknow Super Giants ) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघांचा समावेश आहे. या चार संघामध्ये प्लेऑफचे सामने पार पडणार आहेत. ज्यामधे दोन क्वालिफायर, एक एलिमिनेटर आणि एक फायनल सामना यांचा समावेश आहे.
आयपीएल 2022 च्या पॉइंट टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर होता. 14 पैकी 10 सामने जिंकून ते प्रथम प्लेऑफसाठी पात्र ठरले. यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संघाने 14 पैकी 9 सामने जिंकून दुसरे स्थान पटकावले. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने 14 पैकी 9 सामने जिंकून तिसरे स्थान पटकावले. दुसरीकडे, आरसीबीने 14 पैकी 8 सामने जिंकले आणि गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले. शेवटी, आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरला.