अबुधाबी - आयपीएल 2021 हंगामातील 31 वा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगला आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीकडून दोन तर केकेआरकडून एक खेळाडू या सामन्यातून डेब्यू करत आहे.
आरसीबी संघात दोन तर केकेआरमध्ये एक बदल -
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात दोन बदल केले आहे. त्यांनी केएल भरत आणि वानिंदु हसरंगा यांना अंतिम संघात स्थान दिलं आहे. तर दुसरीकडे व्यंकटेश अय्यर केकेआरकडून डेब्यू करणार आहे.
आरसीबी-केकेआर हेड टू हेड रेकॉर्ड
उभय संघात आतापर्यंत 27 सामने झाली आहे. यात केकेआरने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर आरसीबीचा संघ 13 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्या सत्रात दोन्ही संघ आमने-सामने झाले होते. या सामन्यात आरसीबीने केकेआरचा 38 धावांची पराभव केला होता.
- आरसीबीची प्लेईंग इलेव्हन -
- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएल भरत, ग्लेन मॅक्सवेल, ए बी डिव्हिलियर्स, वानिंदु हसरंगा, सचिन बेबी, कायले जेमिसन, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल.
- केकेआरची प्लेईंग इलेव्हन -
- शुबमन गिल, नीतिश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, लॉकी फर्ग्यूसन, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
हेही वाचा -भारतीय खेळाडू 2021-22 मध्ये राहणार व्यस्त, 'हे' संघ करणार भारताचा दौरा
हेही वाचा -MI vs CSK : होय आम्ही चुकलो, मुंबई इंडियन्सचा पराभवानंतर कर्णधार केरॉन पोलार्डची कबुली