महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल 2021 ला सुरूवात होण्याआधी पाहा रिप्लेसमेंट खेळाडूंची यादी - राजस्थान रॉयल्स

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रात काही खेळाडूंनी दुखापतीमुळे तसेच काहींनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. तेव्हा संघांनी त्या खेळाडूंच्या जागेवर रिप्लेसमेंट खेळाडूंची घोषणा केली. वाचा कोण आहेत रिप्लेसमेंट खेळाडू.

IPL 2021 issues final list of replacements
आयपीएल 2021 ला सुरूवात होण्याआधी पाहा रिप्लेसमेंट खेळाडूंची यादी

By

Published : Sep 19, 2021, 3:20 PM IST

दुबई -आयपीएल 2021च्या दुसऱ्या सत्राला आजपासून यूएईत सुरूवात होणार आहे. या सत्राला सुरूवात होण्याआधी काही खेळाडूंना दुखापत झाली, यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले. तर काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली. तेव्हा संघांनी त्या त्या खेळाडूंच्या जागेवर रिप्लेसमेंट खेळाडूची घोषणा केली. यामुळे दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडिन्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात काही बदल झाले आहेत. वाचा कोण आहेत. ते रिप्लेसमेंट खेळाडू...

रिप्लेसमेंट खेळाडूंची यादी -

  • दिल्ली कॅपिटल्स: एम. सिद्धार्थच्या जागेवर कुलवंत खेजरोलिया, ख्रिस वोक्सच्या जागेवर बेन ड्वारशुइस
  • मुंबई इंडियन्स: मोहसिन खानच्या जागेवर रूश कलारिया
  • पंजाब किंग्स: रिले मेरेदिथच्या जागेरव नाथन एलिस, झाय रिचर्डसनच्या जागेवर आदिल राशिद, डेविड मलानच्या जागेवर एडन मारक्रम
  • राजस्थान रॉयल्स: अँड्रयू टायच्या जागेवर तबरेज शम्सी, जोफ्रा आर्चरच्या जागेवर ग्लेन फिलिप्स, बेन स्टोक्सच्या जागेवर ओशाने थॉमस, जोस बटलरच्या जागेवर एविन लुइस
  • रॉयल चेलेंजर्स बंगळुरू: अॅडम झम्पाच्या जागेवर वनिंदु हसारंगा, डेनियल सॅम्सच्या जागेवर दुश्मंता चमीरा, केन रिचर्डसनच्या जागेवर जॉर्ज गारटोन, फिन एलेनच्या जागेवर टिम डेविड, वाशिंगटन सुंदरच्या जागेवर आकाश दीप
  • सनरायझर्स हैदराबाद: जॉनी बेयरस्टोच्या जागेवर शेरफाने रुदरफोर्ड

ABOUT THE AUTHOR

...view details