महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

India vs New Zealand : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द; वेलिंग्टनमध्ये होणार 3 टी-20 सामने - Indications That The Match will be Cancelled

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ( India vs New Zealand ) पहिल्या सामन्यात दोन्ही संघ वेलिंग्टनमध्ये आमने-सामने आलेले आहेत. सध्या वेलिंग्टनमध्ये पाऊस पडत असल्याने, आता सामना रद्द होण्याचे संकेत ( Indications That The Match will be Cancelled ) मिळाले आहेत

India vs New Zealand
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द

By

Published : Nov 18, 2022, 3:23 PM IST

वेलिंग्टन : ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषकानंतर ( India vs New Zealand ) भारतीय संघ शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन्ही संघ वेलिंग्टनमध्ये आमने-सामने आलेले आहेत. सध्या वेलिंग्टनमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे सामना रद्द होण्याचे संकेत मिळाले ( Indications That The Match will be Cancelled ) आहेत.

वेलिंग्टनमध्ये पावसाचा वाढता जोर, सामना रद्द होण्याची शक्यता :वेलिंग्टनमध्ये पावसाचा जोर सतत वाढत आहे. आता सामन्याबाबत एक अपडेट समोर आली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.16 पर्यंत पाऊस थांबेल, जर तोपर्यंत सामना सुरू झाला नाही, तर तो रद्द केला जाईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मागील 5 सामन्यांमध्ये हेड टू हेडचा आकडा (पूर्वोतिहास) :
21 नोव्हेंबर 2021 - भारत ७३ धावांनी विजयी

19 नोव्हेंबर 2021 - भारत 7 विकेटने जिंकला
17 नोव्हेंबर 2021 - भारत 5 विकेटने जिंकला
31 ऑक्टोबर 2021 - न्यूझीलंड 8 विकेटने जिंकला
2 फेब्रुवारी 2020 - भारत 7 धावांनी जिंकला

न्यूझीलंड संघ :
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.

भारताच्या संघात :
हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, इशान किशन, कुलदीप यादव, भुवन कुमार, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, संजू सॅमसन, उमरान मलिक.

ABOUT THE AUTHOR

...view details