एडिलेड :आज ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषक २०२२ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव केला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लंडने एकही विकेट न गमावता १६ षटकांत लक्ष्य गाठले.
कोहलीने 40 चेंडूत 50 धावांची खेळी इंग्लंडकडून एलेक्स हेल्सने 47 चेंडूत नाबाद 86 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरने 49 चेंडूत 80 धावा केल्या. भारताच्या सहा पैकी चार गोलंदाजांनी 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. याआधी टीम इंडियाच्या हार्दिक पांड्याने सर्वाधिक 63 धावा केल्या. त्याने 33 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि पाच षटकार मारले. हार्दिक शेवटच्या चेंडूवर हिट विकेटवर बाद झाला. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 40 चेंडूत 50 धावांची खेळी खेळली.
पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने 63 धावा केल्या:इंग्लंडच्या डावातील सहा षटके संपली आहेत. इंग्लंडने बिनबाद 63 धावा केल्या आहेत. कर्णधार जोस बटलर 17 चेंडूत 28 आणि एलेक्स हेल्स 19 चेंडूत 33 धावांवर नाबाद आहे.
भारतीय संघाची फलंदाजी :आजच्या महत्त्वाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सुरुवात अत्यंत संथगतीने झाली. केएल राहुल अवघ्या 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराटची जोडी चांगली जमत असतानाच रोहित शर्मा उंच शाॅट मारण्याच्या नादात झेलबाद झाला. रोहित शर्माला या मॅचमध्येसुद्धा आपला फाॅर्म राखता आला नाही. आता पिचवर विराटच एकमेव अनुभवी खेळाडू आहे. सूर्या खेळपट्टीवर चमक दाखवत असतानाच मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. अदिल रशिदच्या बाॅलवर मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्या झेलबाद झाला. इंग्लडकडून ख्रिस वोक्स आणि ख्रिस जाॅर्डनने आणि अदिल रशीदने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताची आतापर्यंतची कामगिरी :जर तुम्ही आकडेवारीवर नजर टाकली तर भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 22 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने 12 सामने जिंकले आहेत आणि इंग्लंड संघाने फक्त 10 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, गेल्या 5 सामन्यांमध्ये टीम इंडियाने चार सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पाकिस्तानशी भिडणार आहे. पाकिस्तानने बुधवारी पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करून आपले अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपापली खास रणनीती आखली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा महान सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून सुरू झाला.
अॅडिलेड ओव्हलवरील हवामानाचा अंदाज :अॅडिलेड ओव्हल येथील हवामान अॅडिलेड ओव्हल मैदानाबाबत मिळालेल्या हवामान अहवालानुसार, आज खेळल्या जाणाऱ्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. हा सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता आणि भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. यावेळी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असली तरी पावसाची शक्यता नाही. तेथील तापमान 16 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
अॅडिलेड ओव्हल खेळपट्टी अहवाल :अॅडिलेड ओव्हल खेळपट्टी अहवाल अॅडिलेड ओव्हलची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी उपयुक्त आहे. इथे दुसऱ्या डावात धावा काढणे कठीण होऊन बसते असे सर्वसाधारणपणे दिसून येते. त्यामुळे या सामन्यातही नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. प्रथम खेळून मोठी धावसंख्या फलकावर टाकून प्रतिस्पर्धी संघाला दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न अधिक परिणामकारक ठरेल. हे दोन्ही संघ लक्षात ठेवतील.