महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs ENG 3rd ODI : हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजी; भारताला विजयासाठी 260 धावांचे लक्ष्य

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या जात असेलेल्या तिसऱ्या सामन्यात ( IND vs ENG 3rd ODI ) इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 259 धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला 260 धावांचे लक्ष्य दिले आहे.

IND
भारत

By

Published : Jul 17, 2022, 8:01 PM IST

मँचेस्टर :भारत आणि इंग्लंड संघात वनडे मालिकेतील तिसरा ( IND vs ENG 3rd ODI ) आणि अंतिम सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार इंग्लंडने 45.5 षटकांत सर्वबाद 259 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला 260 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

भारताला विजयासाठी 260 धावांचे लक्ष्य -

नाणेफेक प्रथम फलंदाजी करायाला आलेल्या इंग्लंड संघाच्या सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी 12 धावा केल्या. या धावसंख्यवर सलग दोन विकेट्स पडल्याने इंग्लंडला मोठा धक्का बसला. त्यामुळे इंग्लंड संघाने शतक पूर्ण करण्या अगोदर म्हणजे 74 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार जोस बटलर आणि मोईन अलीने ( All-rounder Moeen Ali ) पाचव्या विकेट्साठी 75 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर मोईन अलीने 34 (44) धावांवर बाद झाला. त्यानंतर इग्लंडच्या संघाकडूमन छोट्या भागीदारी झाल्या. परंतु त्याचा डाव 45.5 षटकांत 259 धावांवर आटोपला.

हार्दिक पांड्याची शानदार गोलंदाजी -

इंग्लंड संघाकडून कर्णधार जोस बटलरने ( Captain Jos Buttler ) सर्वाधिक धावा केल्या. त्याने 80 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ जेसन रॉय 41 (33), क्रेग ओव्हर्टन 32 (33), बेन स्टोक्स 27 (29) आणि लियाम लिव्हिंगस्टोन 27 (31) धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याने सर्वाधिक 4 विकेट्स ( Hardik Pandya took 4 wickets ) घेतल्या. त्याचबरोबर युझवेंद्र चहल 3, मोहम्मद सिराज 2 आणि रवींद्र जडेजाने 1 विकेट्स घेतली.

हेही वाचा -Pm Modi Congratulates Sindhu : पंतप्रधान मोदींनी सिंगापूर ओपन जिंकल्याबद्दल सिंधूचे केले अभिनंदन

ABOUT THE AUTHOR

...view details