मुबई - आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २१ व्या सामन्यात अखेर गुजरातच्या विजयी घोडदौडीला रोखण्यात हैदराबादला यश आले. आतापर्यंत सलग तीन सामने जिंकलेल्या गुजरातचा हैदराबादने काल सोमवार(दि. 11 एप्रिल)रोजी झालेल्या सामन्यात आठ गडी राखून पराभव केला. (Sunrisers Hyderabad beat Gujarat Titans ) गुजरातने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य हैदराबादने आठ गडी आणि पाच चेंडू राखून गाठले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठी खेळी करत संघासाठी मोठी धावसंख्या निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.
गुजरातचा हा चार सामन्यांतील पहिला पराभव - विल्यमसनने 46 चेंडूंच्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार ठोकले. त्याने अभिषेक शर्मा (42) सोबत पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केल्यानंतर राहुल त्रिपाठी (17) सोबत 40 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. (Bhuvneshwar Kumar ipl ) पूरनने 18 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावा करत उर्वरित पूर्ण केले. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नाबाद 50 धावांच्या जोरावर गुजरातने 7 बाद 162 धावा केल्या होत्या. हैदराबादने 19.1 षटकांत 2 बाद 168 धावा करत गुजरातविरुद्ध पहिल्यांदा पराभवाची चव चाखली. गुजरातचा हा चार सामन्यांतील पहिला पराभव आहे.
सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी - हार्दिकने 42 चेंडूंच्या नाबाद खेळीत चार चौकार आणि 1 षटकार लगावला, तर अभिनव मनोहरने तीन जीवदानांचा फायदा घेत 21 चेंडूंच्या खेळीत एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी करत संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. (Hardik Pandya 50 not ou) या दोघांशिवाय हैदराबादच्या गोलंदाजांनी 22 एक्स्ट्रा देऊन गुजरातला 160 चा टप्पा पार करून दिला. यातील 20 धावा वाईडकडून आल्या.