महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

RR vs GT IPL 2022 : गुजरात टायटन्सचा राजस्थानवर ३७ धावांनी दणदणीत विजय - गुजरात टाययन्सचा राजस्थान रॉयल्स मॅच

गुजरात टाययन्सने राजस्थान रॉयल्सचा ३७ धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करत राजस्थानपुढे १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, वीस षटके संपेपर्यंत राजस्तान रॉयल्स १५५ धावा करु शकला. (Rajasthan Royals lost by 37 runs) दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये धमाकेदार कामगिरी केली.

RR vs GT IPL 2022
RR vs GT IPL 2022

By

Published : Apr 15, 2022, 7:08 AM IST

Updated : Apr 15, 2022, 7:20 AM IST

मुंबई - आयपीएलमधील २४ वा सामना चांगलाच रंगला. (RR vs GT IPL 2022 ) गुजरात टाययन्सने गुणतालिकेमध्ये अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सला ३७ धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करत राजस्थानपुढे १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, वीस षटके संपेपर्यंत राजस्तान रॉयल्स १५५ धावा करु शकला. (Gujarat Titans skipper Hardik Pandya) दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये धमाकेदार कामगिरी केली. हार्दिक पांड्याने उभारलेल्या ८७ धावांमुळेच गुजरातला विजयापर्यंत पोहोचता आले.

बटरलने अर्धशतकी खेळी करत ५४ धावा केल्या - राजस्थान रॉयल्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. सलामीला आलेल्या जोस बटरलने अर्धशतकी खेळी करत ५४ धावा केल्या. मात्र, देवदत्त पडिक्कल खाते न खोलताच तंबूत परतला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आठ धावांवर झेलबाद झाला. तर, संजू सॅमसन अकरा धावांवर असताना हार्दिक पांड्याने डायरेक्ट हीट केल्यामुळे तो धावबाद झाला. (Opening batsman Jose Butler ) पहिल्या फळीतील फलंदाज खास कामगिरी करू न शकल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर चांगलाच दबाव आला होता.

राजस्थानचा संघ १५५ धावा करु शकला - यामध्ये शिमरोन हेटमायरने २९ तर रियान परागने १८ धावा करत संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी मोठी धडपड केली. मात्र, राजस्थानचा संघ अवघ्या १५५ धावा करु शकला. शेवटच्या फळीतील प्रसिद्ध कृष्णा (४ नाबाद), युजवेंद्र चहल (५), कुलदीप सेन (0 नाबाद) दहा धावादेखील करु शकले नाहीत.

हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी केली - राजस्थानने याआधी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातकडून सलामीला आलेल्या मॅथ्यू वेड आणि शुभमन गिलने निराशा केली. (Gujarat Tians beat Rajasthan Royals) मॅथ्यू वेड अवघ्या १२ धावांवर असताना व्हॅन डर ड्यूसेनच्या डायरेक्ट हीटवर धावबाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी आलेला विजय शंकरदेखील अवघ्या दोन धावांवर कुलदीप सेनने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी केली. त्याने मैदानावर पाय रोवून चार षटकार आणि आठ चौकार लगावत नाबाद ८७ धावा केल्या.

मुंबईला विजयासाठी १९३ धावा कराव्या लागणार होत्या - चौथ्या आणि पाचव्या विकेटसाठी आलेल्या अभिनव मनोहर आणि डेविड मिलरने हार्दिक पांड्याला साथ दिली. अभिनवने २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. तर डेविड मिलरने १४ चेंडूंमध्ये एक षटकार आणि पाच चौकार लगावत नाबाद ३१ धावा केल्या. वीस षटकांत गुजरातने १९२ धावा केल्यानंतर मुंबईला विजयासाठी १९३ धावा कराव्या लागणार होत्या.

राजस्थानचे गोलंदाज अपयशी झाले - राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवात चांगली करत गुजरातच्या दोन फलंदाजांना १५ धावांच्या आत तंबूत पाठवले. त्यानंतर मात्र हार्दिक पांड्याला रोखण्याता राजस्थानचे गोलंदाज अपयशी झाले. गुलदीप सेन, युजवेंद्र चहल आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्यानंतर मात्र निशाम, प्रसिध कृष्णा आणि आर अश्विन एकाही फलंदाजाला तंबुत पाठवू शकले नाही.

हेही वाचा -Alia Ranbir Wedding Photos : पाहा, आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्याची खास क्षणचित्रे

Last Updated : Apr 15, 2022, 7:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details