मेलबर्न -ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने आगामी आयपीएल लिलावाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मॅक्सवेलने विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाबरोबर खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच विराटच्या नेतृत्वात खेळताना मला आनंद होईल, असेही मॅक्सवेल म्हणाला.
आयपीएल २०२० मध्ये मॅक्सवेलचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघात समावेश होता, परंतु यावर्षी संघाने त्याला मुक्त केले. त्यामुळे गुरुवारी (१८ फेब्रुवारी) होणाऱ्या आयपीएलच्या लिलावासाठी तो उपलब्ध असणार आहे. मॅक्सवेलची बेस प्राईज २ कोटी आहे.
एका वेबसाइटवर बोलताना मॅक्सवेल म्हणाला की, ''माझे विराटबरोबर चांगले जमू शकते. विरा'च्या नेतृत्वात खेळताना मला खूप आनंद होईल आणि मला त्याच्याबरोबर फलंदाजी करायलाही आवडेल. त्याच्याबरोबर काम करणे आनंददायी असेल आणि माझ्यासाठी या प्रवासात तो नेहमीच उपयुक्त ठरला आहे.''