नवी दिल्ली : श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने दनुष्का गुनाथिलकाला ( Sri Lanka Cricket has Decided to Suspend Danushka Gunathilaka ) तत्काळ ( Danushka Gunthilaka Accused of Rape in Australia ) निर्णयाने, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक केल्यानंतर ( Danushka Gunathilaka Arrested and Charged with Sexually Assaulting a Woman ) आणि त्याच्यावर आरोप झाल्यानंतर कोणत्याही निवडीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही, असे श्रीलंका क्रिकेटने सांगितले.
श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप : श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणथिलाका ( Danushka Gunthilaka ) याच्यावर ऑस्ट्रेलियात बलात्काराचा आरोप झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने त्याच्यावर कारवाई केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. त्यामुळे आता बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळता येणार नाहीत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी काढले निवेदन :श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी एक निवेदन समोर आणले आहे. त्यात म्हटले आहे की, "दानुष्का गुणथिलाका याने ऑस्ट्रेलियात एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपानंतर आणि त्याच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर, श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला आहे.'' या निवेदनात या आरोपाची चौकशी करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट तातडीने आवश्यक पावले उचलेल आणि ऑस्ट्रेलियन न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यास त्याला शिक्षाही केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.