महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Rahul Dravid on Suryakumar Yadav : सूर्यकुमारला फलंदाजी करताना पाहणे म्हणजे आनंदाची पर्वणी : राहुल द्रविड

सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात 25 चेंडूत 61 धावा केल्या. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सूर्याची स्तुती केली ( Indian Cricket Team Head Coach Rahul Dravid ) आहे. त्याला फलंदाजी करताना पाहताना आनंद मिळतो. सूर्यकुमारने या स्पर्धेत आतापर्यंत 225 धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट उत्कृष्ट आहे.

By

Published : Nov 7, 2022, 6:06 PM IST

Rahul Dravid on Suryakumar Yadav
सूर्यकुमारला फलंदाजी करताना पाहणे म्हणजे आनंदाची पर्वणी

मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Indian Cricket Team Head Coach Rahul Dravid ) म्हणाले की, जेव्हा सूर्यकुमार यादव क्रीजवर असतो तेव्हा त्याची फलंदाजी पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. झिम्बाब्वेवर भारताच्या 71 धावांनी विजय मिळविल्यानंतर द्रविड म्हणाला, मला वाटते की त्याने आमच्यासाठी अपवादात्मक कामगिरी केली आहे. त्याला फलंदाजी करताना पाहणे आनंददायक आहे. तो अशा फॉर्ममध्ये असताना त्याला पाहणे खूप आनंददायी आहे. प्रत्येक वेळी असे दिसते की, तो मनोरंजनासाठी उतरला आहे आणि त्यात शंका नाही.

द्रविड यांनी केले कौतुक :सूर्यकुमारने झिम्बाब्वेविरुद्ध 25 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. त्याच्या या शानदार खेळीबद्दल मुख्य प्रशिक्षक म्हणाले, "होय, हे अविश्वसनीय आहे. त्यामुळे तो सध्या टी-20 मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे. सूर्यकुमारने या स्पर्धेत आतापर्यंत 225 धावा केल्या असून, त्याचा स्ट्राईक रेट उत्कृष्ट आहे. द्रविड म्हणाला, त्याचा स्ट्राइक रेट आता आहे तिथे टिकवणे सोपे नाही. त्यामुळे तो ज्याप्रकारे फलंदाजी करतोय ते अप्रतिम आहे. त्याच्या प्रक्रियेबाबत त्याची रणनीती स्पष्ट आहे.

सूर्या करतोय खूप मेहनत :तो म्हणाला, मेहनत केली आहे. सूर्याची खासियत म्हणजे तो कठोर सराव करतो आणि त्याच्या खेळाकडे आणि फिटनेसकडे लक्ष देतो. गेल्या दोन वर्षांत मैदानावर आणि मैदानाबाहेर केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळत आहे. वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननेही सूर्यकुमारचे कौतुक केले.

अश्विनने केली सूर्याची स्तुती :अश्विन म्हणाला, सूर्या ज्या पद्धतीने फलंदाजी करीत आहे ते आश्चर्यकारक आहे. तो अजूनही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच आहे आणि व्यक्त होत आहे. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करीत आहे, तो संघातील इतर फलंदाजांनाही पूरक ठरत आहे. भारतीय संघातील अव्वल तीन फलंदाज केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संथ गोलंदाजांवर मारा करायला आवडते. याच वेळी सूर्यकुमार दृश्यात येतो.

स्वीप आणि रिव्हर्स स्वीप : अश्विन म्हणाला, आमच्या संघातील प्रत्येकजण संथ गोलंदाजांना चांगला खेळवत आहे. याचे कारण स्वीप आणि रिव्हर्स स्वीप आहे कारण तुम्ही स्पिनर्सवर इतर फील्ड शॉट्स मारू शकत नाही. जर तुम्ही स्वीप आणि रिव्हर्स स्वीप करू शकणारे खेळाडू असाल तर त्याचा संघाला फायदा होतो. अश्विनला सूर्याच्या वेगवान गोलंदाज रिचर्ड नागरावावर स्लॉग स्वीपबद्दल विचारले असता तो म्हणाला, मी काय वर्णन करू. त्याचा स्वीप शॉट, कोणीतरी फास्ट बॉलरला असा स्वीप करेल, अशी अपेक्षा तुम्ही करणार नाही पण सूर्या असाच खेळतो.

ABOUT THE AUTHOR

...view details