नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज सूर्यकुमार यादवने बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या आयसीसी पुरुषांच्या टी-20 फलंदाजी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर पाकिस्तानी जोडी मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना भारतीय फलंदाजाच्या जवळ येण्याची संधी मिळाली आहे. टीम इंडियाचा टी-20 स्पेशालिस्ट फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या देशांतर्गत टी-20 मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये सूर्या गोल्डन डकवर बाद झाला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्याचा खराब फॉर्म अजूनही कायम असून तो 1-1 धावा करण्यासाठी आसुसलेला आहे.
सूर्यकुमार टी-20 क्रमवारीत आघाडीवर :बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या टी-20 फलंदाजीच्या क्रमवारीपूर्वी, असे मानले जात होते की सूर्या आपले पहिले स्थान गमावेल आणि पाकिस्तानचा धडाकेबाज सलामीवीर मोहम्मद रिझवान त्याला मागे टाकून प्रथम क्रमांकाचा टी-20 फलंदाज बनेल. मात्र असे झालेले नाही. सूर्यकुमार टी-20 क्रमवारीत 906 गुणांसह भक्कम आघाडी कायम राखत आहे. रिझवान 811 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर बाबरने एका स्थानाने प्रगती करत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात 755 गुण आहेत.