महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : डेव्हिड वॉर्नरचा पुष्पा अवतार सोशल मीडियावर व्हायरल! फॅन्स म्हणाले, हा तर.. - दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर पुष्पा अवतारात दिसला. यावर क्रीडाप्रेमींकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

David Warner
डेव्हिड वॉर्नर

By

Published : Apr 21, 2023, 4:39 PM IST

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर नव्या रुपात दिसत आहे. वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा प्रमाणे लूक केला आहे.

डेव्हिड वॉर्नरने अल्लु अर्जुनसारखा लूक केला : तेलुगु चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. त्यानंतर आता त्याचा 'पुष्पा - २' हा चित्रपटही येतो आहे. यामध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुन एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या धर्तीवरच डेव्हिड वॉर्नरने त्याचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुष्पा - 3 म्हणून शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो आल्यानंतर त्यावर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

वॉर्नरची दिल्ली गुणतालिकेत तळाशी : डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ या आयपीएलमध्ये अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांमध्ये फक्त एकाच सामन्यात विजय मिळवू शकला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर काल कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली संघाने हा एकमात्र विजय मिळवला. मात्र अजूनही दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सध्या तळाशी आहे.

वॉर्नर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी : एकीकडे दिल्लीचा संघ जरी वाईट कामगिरी करत असला तरी दुसरीकडे कर्णधार डेव्हिड वॉर्नरची बॅट मात्र चांगली तळपते आहे. या सामन्यातही डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा आपल्या नावाला साजेशी खेळी केली. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डेव्हिड वॉर्नर आरसीबीच्या फाफ डू प्लेसिस नंतर दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या सहा सामन्यांमध्ये 285 धावा झाल्या आहेत.

हे ही वाचा :IPL 2023 : ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत RCB चा दबदबा, पॉइंट्स टेबलमध्ये हा संघ अव्वल स्थानी

ABOUT THE AUTHOR

...view details