हैदराबाद- आयपीएल सामने हे खेळाडुंच्या चांगल्या खेळींनी आणि विक्रमांनी चर्चेत येतात. मात्र, दुबईमधील आयपीएलचा सामना वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. दीपक चहरने दुबईमधील स्टेडियममध्ये मैत्रीण जया भारद्वाजला मागणी प्रपोज केले.
क्रिकेटपटू दिपक चहरने गुडघे टेकवून प्रेयसी जया भारद्वाजला प्रपोज केले. यावेळी जया भारद्वाजही भावुक झाली. जयाने दीपकच्या प्रपोजचा स्वीकार केला. एखाद्या सिनेमातील प्रसंगासारखे हे दृश्य होते. माध्यमातील वृत्तानुसार जया भारद्वाज आणि दीपक चहर हे खूप काळापासून एकत्रित राहत आहेत.
दीपकला चाहत्यांकडून मिळाल्या भरभरून शुभेच्छा
दीपक चहरने प्रेयसीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर प्रपोज करत असलेला व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यावर खास क्षण असल्याची कॅप्शनही चहरने दिली आहे. काही वेळातच या पोस्टला 4.16 लाख लोकांनी पसंती दर्शविली आहे. दोघांचा व्हिडिओ तासाभरातच 9.03 लाख लोकांना पाहिला आहे. अनेक वापरकर्त्यांनी दीपक चहरला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपक हे सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही. तरीही त्याला 1.2 दशलक्ष लोक फॉलो करतात. तर दीपकने आजपर्यंत 249 पोस्ट इन्स्टाग्रामवर केल्या आहेत.