नवी दिल्ली :T20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022 ) च्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर बीसीसीआयमध्ये बदल करण्याची मागणी ( New BCCI Selection Committee ) सातत्याने होत होती. या अंतर्गत, बोर्डाने आता आपल्या सर्व निवडकर्त्यांना बडतर्फ केले आहे ( Sacked Four Member Senior National Selection Committee ) आणि या पदासाठी नवीन अर्ज आमंत्रित केले आहेत. रोहित शर्मांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत 10 गडी राखून पराभवाचा ( Former Fast Bowler Ajit Agarkar Becoming Chief Selector ) सामना करावा लागला. आता बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली आहे.
निवड समितीमधील सदस्य :चेतन शर्मा (उत्तर विभाग), हरविंदर सिंग (मध्य विभाग), सुनील जोशी (दक्षिण विभाग) आणि देबाशिष मोहंती (पूर्व विभाग) यांना वगळण्यात आले आहे. यापैकी काही निवडकांची 2020 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर भारतीय संघातदेखील बदल केल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंड दौऱ्याकरिता हार्दिक पांड्याला टी20चा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते. तर वनडे मॅचकरिता शेखर धवन कर्णधार असणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षकासदेखील विश्रांती देण्यात आली होती. न्यूझीलंड दौऱ्याकरिता व्हीव्हीएस लक्ष्मण यांना प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते. त्यामुळे अपेक्षा होती की, निवड समितीमध्येसुद्धा बदल होऊ शकतात.
माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर असणार बीसीसीआयची पहिली पसंती :सूत्रांच्या माहितीनुसार, माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर, जो गेल्या वेळी मुख्य निवडकर्ता होण्यापासून दूर राहिला होता, तो बीसीसीआयची पहिली पसंती आहे. अजित आगरकर सध्या आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत. मुख्य निवडकर्ता होण्यासाठी त्याला दिल्ली कॅपिटल्सच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.बीसीसीआय आपल्या पुढील बैठकीत भारतीय क्रिकेटबाबत मोठा रोडमॅप सादर करेल, जेणेकरून आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी योग्य तयारी करता येईल आणि पर्यायी खेळाडूंची निवडही करता येईल, अशी अपेक्षा आहे. तयार ठेवता येईल.