महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Virat Kohli Birthday 2022 : भारताचा प्रसिद्ध फलंदाज 'विराट'चा आज 34 वा वाढदिवस; बीसीसीआयने दिल्या स्पेशल शुभेच्छा

भारताचा ( Former Captain of Indian Cricket Team ) प्रसिद्ध फलंदाज किंग विराट कोहली आज ५ नोव्हेंबर रोजी ३४ वा वाढदिवस साजरा करीत ( King Virat Kohli is Celebrating His Birthday Today ) आहे. आज कोहलीच्या वाढदिवसाला बीसीसीआयनेदेखील ( BCCI Celebrating Virat Kohli Birthday ) त्याला शुभेच्छा देत त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. T20 विश्वचषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात उद्या भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. त्याआधी आज टीम इंडियामध्ये जबरदस्त सेलिब्रेशन सुरू आहे.

Virat Kohli Birthday 2022
भारताचा प्रसिद्ध फलंदाज 'विराट'चा आज 34 वा वाढदिवस

By

Published : Nov 5, 2022, 12:46 PM IST

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ( Former Captain of Indian Cricket Team ) आणि जबरदस्त फॉर्ममध्ये धावणारा विराट कोहली आज आपला वाढदिवस साजरा ( King Virat Kohli is Celebrating His Birthday Today ) करीत आहे. आज 5 नोव्हेंबर रोजी त्यांचा 34 वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेदेखील विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ( BCCI Celebrating Virat Kohli Birthday ) सेलिब्रेशन केले. T20 विश्वचषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात उद्या भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. त्याआधी आज टीम इंडियामध्ये जबरदस्त सेलिब्रेशन सुरू आहे.

विराटवर देश-विदेशातील त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव :विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त देश-विदेशातील त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा सिलसिला सुरूच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक पोस्टर शेअर करून कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पोस्टरमध्ये कोहलीने 477 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केलेल्या 24,350 धावांचा उल्लेख आहे. तसेच, 2011 च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य आणि 2013 ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता असादेखील उल्लेख आहे.

भारतीय संघाच्या खेळाडूंकडून विराटला शुभेच्छा : भारतीय संघाच्या अनेक सहकारी खेळाडूंनी विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी कोहलीसोबतचा त्यांचा संस्मरणीय फोटो शेअर केला आहे. सुरेश रैनाने आपल्या डावात एकत्र खेळतानाचा फोटो शेअर करून त्याचे अभिनंदन केले आहे.

शिखर धवनने ट्विटरद्वारे फोटो शेअर करीत दिल्या शुभेच्छा :शिखर धवनने सामन्याच्या मैदानावरील विजयी क्षणाचा फोटो शेअर करीत विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहली फाउंडेशननेही दिल्या शुभेच्छा :विराट कोहली फाउंडेशननेही विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवतो : विराटने ज्या पद्धतीने संघातील आपले स्थान बळकट केले आहे. त्याने त्याच्या कर्णधारपदाची कारकीर्दसुद्धा गाजवली आहे. त्याच्याबद्दल कितीही स्तुतीसुमने उधळली तरी कमीच आहेत. त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. आपण स्वत:चे आणि कामाचं नेहमीच विश्लेषण करून ज्यामध्ये कमकुवत आहात, त्यावर काम कसे करायचे हे आपण त्याच्याकडून शिकले पाहिजे. एखादी गोष्ट, पोस्ट मिळाल्यावर काही लोक आळशी होतात. अशावेळी विराट कोहलीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा. शिकायचे सोडू नका. विराट कोहलीला हे खूप लवकर समजले होते. म्हणून विराट कोहलीने वारंवार मेहनत घेतली, फ्लॉप गेल्यानंतर निराश झाला नाही. पुन्हा नव्या उमेदीनं त्यावर काम केले. 2016 च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट अपयशी ठरला होता.

टीका झाल्यानंतरसुद्धा त्याने घेतली उभारी : त्यावेळी त्याच्यावर टीका झाली होती. त्यावेळी त्याने स्वत:वर काम केले. पुढील इंग्लंड दौऱ्यात त्याने धावांचा पाऊस पाडला होता. इतकेच नाही, ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर एका शतकासाठी विराट कोहलीला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहायला लागली. याकाळात कर्णधारपदही गेलं, विराट कोहीलचं करिअर संपलं, त्यानं क्रिकेट सोडावं, यासारख्या कमेंट आल्या. पण विराट कोहली खचला नाही, नव्या दमानं परतला. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकातील त्याची फलंदाजी सर्वकाही सांगून जाते. विराट कोहली नेहमीच स्वतच्या चुकामधून शिकतो. त्याचं हे कौशल्य तुम्हीही अवगत केल्यास यश नक्कीच मिळेल.

ABOUT THE AUTHOR

...view details