नवी दिल्ली :ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे कौतुक केले आहे. स्टीव्ह स्मिथने सांगितले की, संजू सॅमसनने आयपीएल 2022 च्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. सॅमसन आता तरुण नसून तो अनुभवी खेळाडू बनला आहे.
राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जमध्ये सामना :आज, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा 8 वा सामना गुवाहाटी स्टेडियमवर खेळवला जात आहे. आजच्या सामन्यात सॅमसन त्याच्या शेवटच्या आयपीएल मोसमापासून आत्मविश्वास घेण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलच्या या मोसमात दोन्ही संघ आपला दुसरा सामना खेळणार आहेत. याआधी राजस्थान आणि पंजाबने या लीगमधील पहिला सामना जिंकला होता.
स्टीव्ह स्मिथने संजू सॅमसनचे केले कौतुक : संजू सॅमसनने यंदाच्या आयपीएल २०२३ मध्ये आपल्या खेळीची चांगली सुरुवात केली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, 'संजू सॅमसन हा तरुण खेळाडू नाही, परंतु अनुभवाच्या बाबतीत संजू सॅमसन तरुण आहे.
शिखर धवनला स्वत:ला सिद्ध करायचे आहे :संजू सॅमसनने गेल्या हंगामात रॉयल्सचे शानदार नेतृत्व केले होते आणि संघाला अंतिम फेरीत नेले होते. गेल्या मोसमातील सीजनमधून धडा घेत तो आजच्या सामन्यात खेळणार आहे. मला वाटते की, राजस्थान रॉयल्स या सीजनमध्येही चांगली कामगिरी करेल. त्याचवेळी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणनेही आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, शिखर धवन हा आयपीएलचा वरिष्ठ खेळाडू आहे आणि शिखर धवनची फलंदाजीही सातत्यपूर्ण आहे. शिखर धवनला यंदा कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे आहे आणि त्यासाठी त्याची फलंदाजी आवश्यक आहे.
हेही वाचा :Rishabh Pant In Stadium : दिल्लीला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटर पंत पोहचला स्टेडियममध्ये, सोशल मीडियावर व्हिडिओ होतेय व्हायरल