महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 : सचिनच्या पोराने घेतला बापाचा बदला! होतोय सोशल मीडियावर ट्रेंड - arjun tendulkar revenge

हैदराबादविरुद्ध आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सचा खेळाडू अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त कामगिरी केली. या सामन्यात त्याने आपले वडील सचिन तेंडुलकरचा बदला घेतला आहे. यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.

arjun tendulkar
अर्जुन तेंडुलकर

By

Published : Apr 19, 2023, 10:26 PM IST

नवी दिल्ली : आयपीएल मध्ये सध्या सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू अर्जुन तेंडुलकरची सगळीकडे चर्चा होत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. त्यामुळे सर्व दिग्गज क्रिकेटपटूंकडून अर्जुनचे कौतुक होत आहे.

अर्जुनने 14 वर्षांनंतर बदला पूर्ण केला : या मॅचमध्ये अर्जुनने वडील सचिन तेंडुलकरचा बदला घेतला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अर्जुनने 14 वर्षांनंतर आपला बदला पूर्ण केला आहे. सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील विजयात मुंबईचा युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर सर्वाधिक वाहवा लुटत आहे. या सामन्यात त्याने 2.5 षटके गोलंदाजी केली, ज्यात त्याने 18 धावा देऊन आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. अर्जुनने भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली.

ही आहे बदल्याची कहाणी : या बदल्याची कहाणी 12 जानेवारी 2009 पासून सुरू होते. त्या दिवशी राजीव गांधी स्टेडियमवर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. त्यावेळी मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये सचिन तेंडुलकर मुंबईसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. तेव्हा 19 वर्षीय भुवनेश्वर कुमारने त्याला खाते न उघडता शून्यावर बाद केले. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सचिन प्रथमच शून्यावर बाद झाला होता. मात्र आता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने याच मैदानावर भुवनेश्वर कुमारला आयपीएल कारकिर्दीतील पहिला बळी बनवून बदला पूर्ण केला आहे.

अर्जुन तेंडुलकर आणि रोहित शर्मा

सुनील गावस्करने केली स्तुती : दिग्गज सलामीवीर सुनील गावस्कर यांनी अर्जुनला सांगितले की, 'ज्युनियर तेंडुलकरचा स्वभाव त्याचे वडील, महान सचिन तेंडुलकर याच्यासारखा आहे. अर्जुनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी शेवटचे षटक टाकले आणि त्याची पहिली आयपीएल विकेट घेऊन मुंबईला 14 धावांनी विजय मिळवून दिला. सचिन तेंडुलकरकडे त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच अप्रतिम प्रतिभा होती, मात्र त्यासोबतच त्याचा स्वभावही अप्रतिम होता. अर्जुनचाही स्वभाव तसाच आहे, असे गावस्करने म्हटले आहे.

हेही वाचा :IPL 2023 : 'अखेर तेंडुलकरला मिळाली आयपीएल विकेट', मुलगा अर्जुनच्या कामगिरीवर सचिनने केले हे मजेदार ट्विट

ABOUT THE AUTHOR

...view details