महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL Turning Point : हैदराबादच्या पराभवाची मालिका सुरुच, प्लेऑफसाठी अडचणी वाढल्या - tata ipl 2022

सुमारे दीड आठवड्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad ) उंच भरारी घेतली होती. त्यांच्या IPL 2022 च्या मोहिमेतील सलग पाच विजयांसह, प्लेऑफच्या शर्यतीत केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघ सहज प्लेऑफसाठी पात्र ठरेल असे वाटत होते. परंतु त्यांच्या अडचणीत सध्या वाढ होत आहे

srh
srh

By

Published : May 9, 2022, 4:56 PM IST

मुंबई:इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम संध्या रोमांचक स्थितीतून जात आहे. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा ( Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad ) संघात पार पडला. या सामन्यात हैदराबादला वानखेडे स्टेडियमवर आरसीबीकडून 67 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा असा सामना होता ज्यात विल्यमसनने नाणेफेक गमावली आणि शेवटी सामना देखील गमावला.

सामन्यानंतर विल्यमसन म्हणाला, "आम्हाला थोडे अधिक सर्जनशील बनले पाहिजे आणि वेग बदलण्याचे मार्ग शोधले पाहिजेत." आम्ही बाहेर होतो, आरसीबी खरोखर एक मजबूत संघ आहे, खरंतर सर्व संघ खरोखर मजबूत आहेत. आम्हाला सुधारणा कण्याची गरज आहे, परंतु जास्त विचार करण्याची गरज नाही. मार्जिन नेहमीच ठीक असतात, परंतु आम्हाला सुधारणेची चिन्हे दर्शविणे आवश्यक आहे.

विराट कोहली सामन्याच्या पहिल्याच चेंडू खेळताना गोल्डन डकवर ( Virat Kohli Golden Duck ) बाद झाला. तेव्हा आशेचा थोडासा किरण दिसत होता. पण तिथून फाफ डू प्लेसिस आणि दिनेश कार्तिकसह रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी हैदराबादच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतींमुळे खेळू शकले नाहीत. कार्तिक त्यागी आणि उमरान मलिक यांनी पहिल्या षटकात अनुक्रमे 17 आणि 20 धावा दिल्या.

हैदराबादने त्यांच्या शेवटच्या तीन सामन्यात 199, 202 आणि 207 धावा केल्या. रविवारीही हा ट्रेंड कायम राहिला. रविवारी हैदराबादविरुद्ध बंगळुरूने 192 धावा केल्या. शेवटच्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने होते, तेव्हा हैदराबादने बंगळुरूचा डाव 68 धावांत संपुष्टात आणला होता. परंतु कालच्या सामन्यात हैदराबादने महत्त्वाच्या वेळी झेल सोडले आणि अनेक वेळा सीमारेषेवर गेले. आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवातीच्या चेंडूवर विल्यमसन धावबाद झाल्यावर दबावाखाली खेळण्यास सुरुवात झाली. राहुल त्रिपाठीने 37 चेंडूत 58 धावांची एकाकी झुंज दिली.

हेही वाचा -IPL 2022 Updates : विराट कोहलीच्या ब्रेक घेण्याच्या चर्चेनंतर सुनील गावस्करांनी दिला सल्ला; म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details