मुंबई - कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला कोरोनाची लागण झाली आहे. कृष्णा कोरोनाची लागण झालेला केकेआरचा चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर आणि टिम सेफर्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
एएनआयला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण चक्रवर्ती आणि संदीपर वॉरियर आणि टीम सेफर्ट यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर सर्वांची चाचणी करण्यात आली. यात प्रसिद्ध कृष्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी प्रसिद्ध कृष्णाची निवड भारतीय संघात स्टॅडबॉय म्हणून करण्यात आली आहे. शुक्रवारी अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.