नवी दिल्ली:सोशल मीडिया, स्पॉट-फिक्सिंग वादानंतर चाहत्यांच्या भावना, मैदानावरील आणि मैदानाबाहेर खेळाडूंची कामगिरी यासह आयपीएल हा एक ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपट आहे. कदाचित यामुळेच आयपीएल जगातील इतर क्रिकेट लीगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात मोठी आहे. तथापि, खेळाडूंचा लिलाव आणि फ्रँचायझी-आधारित मालकी या संकल्पनांचे प्रदर्शन करणारी आयपीएल ही पहिली टी-20 स्पर्धा ( IPL is the first T20 tournament ) होती. जगातील बहुतेक लीगने या गोष्टी एकत्र केल्या असल्या, तरी त्यापैकी एकाही लीगला आयपीएलपेक्षा जास्त यश मिळालेले नाही.
आयपीएल स्पर्धेला 2008 साली सुरुवात ( IPL started in 2008 ) झाली आहे. त्याचबरोबर आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट असोसिएशनने टी-20 कप नावाची पहिली टी-20 देशांतर्गत लीग सुरू केली (आता टी-20 ब्लास्ट म्हणून ओळखले जाते). काही लोकांचा असा विश्वास आहे की, माजी आयपीएल कमिशनर ललित मोदी यांनी या लीगपासून प्रेरणा घेऊन आधुनिक आयपीएलची संकल्पना तयार केली आहे. तसेच आज आपण जगभरातील इतर टी-20 लीगवर आणि त्यांच्या बक्षिसांच्या रकमेवर एक नजर टाकणार आहोत.
पाकिस्तान सुपर लीग (3.67 कोटी रुपये) -पीएसएल ( Pakistan Super League ) ही एक व्यावसायिक फ्रेंचायझी आधारित टी-20 क्रिकेट लीग आहे. ज्यामध्ये सहा संघ पाकिस्तानच्या सहा शहरांचे प्रतिनिधित्व करतात. या लीगची स्थापना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली होती. स्वतंत्रपणे मालकीच्या संघांचे फेडरेशन म्हणून कार्य करण्याऐवजी, लीग ही एकच संस्था आहे, ज्यामध्ये प्रत्येक फ्रेंचायझी गुंतवणूकदारांच्या मालकीची आणि नियंत्रित केली जाते. मात्र, आयपीएल भारतीय क्रिकेटला ज्या प्रकारे सेवा देत आहे, त्याप्रमाणाने पीएसएल खूपच मागे आहे. पीएसएल आणि आयपीएलची तुलना करताना, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया म्हणाला की दोन्ही भिन्न आहेत.
माजी पाकिस्तानी लेग-स्पिनरने आयएएनएसला सांगितले की, "एक अतिशय व्यावसायिक कार्यक्रम असल्याने, आयपीएल भारतीय क्रिकेटला अनेक प्रतिभा प्रदान करत आहे आणि प्रत्येक हंगामात ते अधिक चांगले होत आहे. तर पीएसएल पाकिस्तानच्या क्रिकेटसाठी क्वचितच काही करत आहे. जर एखाद्या खेळाडूने पीएसएलमध्ये चांगली कामगिरी केली तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अव्यावसायिक दृष्टिकोनामुळे त्याची राष्ट्रीय संघात येण्याची शक्यता कमी झाली आहे.