महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Big Jersey: आयपीएल 2022 समारोप सोहळ्यात लॉन्च केली सर्वात मोठी आयपीएल जर्सी - Big jersey of IPL

आयपीएल 2022 च्या समारोप सोहळ्यात ( IPL 2022 closing ceremony ) सर्वात मोठ्या जर्सीचे अनवारण करण्यात आले. ज्या जर्सीवर 10 संघाचे लोगो छापण्यात आले होते. तसेच ही जर्सी आयपीएलच्या पंधराव्या वर्षाचे प्रतिक होते.

IPL 2022 Big Jersey
IPL 2022 Big Jersey

By

Published : May 30, 2022, 4:31 PM IST

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2022 ) च्या 15 व्या हंगामात रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर समारोप समारंभात एक विशाल आयपीएलची जर्सी ( Big jersey of IPL ) प्रदर्शित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलची सर्वात मोठी जर्सी लॉन्च करण्याची घोषणा केली. त्यानंतर जर्सी लॉन्च करण्यात आली. जर्सीवर आयपीएलची 15 वर्ष असं लिहले होते, जी स्पर्धेच्या 15 व्या हंगामाचे प्रतिनिधित्व करते. त्यात आयपीएल 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 10 संघांचे लोगो देखील होते.

आयपीएलने सर्वात मोठ्या क्रिकेट जर्सीचा विश्वविक्रम केला -

समारोप समारंभात आयपीएलने सर्वात मोठ्या जर्सीचा विश्वविक्रम केला. समारोप समारंभाच्या आधी संपूर्ण स्टेडियममध्ये जर्सी प्रदर्शित करण्यात आली. आयपीएलच्या सर्व 10 संघांचा लोगो जर्सीवर बनवला आहे. समारोप समारंभ सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ), सचिव जय शाह आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गिनीज रेकॉर्डचे प्रमाणपत्र स्वीकारले.

आयपीएलने नंतर ट्विटरवर जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर जर्सी लाँच करण्याचा व्हिडिओ शेअर केला.

अंतिम सामना पाहण्यासाठी 1 लाख 25 हजार प्रेक्षकांची उपस्थिती -

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स ( Rajasthan Royals and Gujarat Titans ) यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी जवळपास 1 लाख 25 हजार प्रेक्षक जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. समारोप सोहळाही सुरू झाला आहे. रणवीर सिंगने इंडिया जीतेगा गाण्यावर धाकड परफॉर्मन्स केला.

स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टर्सशी प्री-फायनल चॅटमध्ये, डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलर म्हणाला, “खूप काळ लोटला आहे, अशा फायनल फार वेळा येत नाहीत. यामुळे मी खूप उत्साहित आहे.

हेही वाचा -Gujarat Wins Ipl Final 2022: गुजरातचा Ipl'फाइनलमध्ये राजस्थानवर 'हार्दिक' विजय

ABOUT THE AUTHOR

...view details