जळगाव -जिल्ह्यातील जामनेर शहरात काही दिवसांपासून आयपीएल स्पर्धेवर सट्टा खेळला जात होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर पोलिसांच्या मदतीने या सट्ट्याच्या अड्ड्यावर छापा टाकून, सट्टा खेळणाऱ्या १४ जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जामनेरात आयपीएल स्पर्धेवर सट्टा खेळणाऱ्या १४ जणांना अटक; 'एलसीबी'ची कारवाई - आयपीएल सट्टा न्यूज
जामनेर शहरातील श्रीरामनगर भागात आयपीएल स्पर्धेवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता.
जामनेर शहरातील श्रीरामनगर भागात आयपीएल स्पर्धेवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. श्रीरामनगरातील अशोक उखर्डू हिवराळे याच्या प्लॉट नंबर ३० मध्ये हा सारा प्रकार चालू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून सट्टा खेळणाऱ्या १४ जणांना अटक केली.
असा मुद्देमाल केला जप्त-
पोलिसांनी या कारवाईत क्रिकेट खेळाचे सट्टा बेटिंगसाठी लागणारे साहित्य, मोबाईल २७, कॉम्प्युटर ३, लॅपटॉप १, टीव्ही २, अॅडाप्टर ४, चार्जर ४, इलेक्ट्रीक बोर्ड ३, इंटरनेट मॉडेम ३, प्रिंटर २, बारकोड स्कॅनर १, प्रिंटर पेपर रोल १ तसेच ८ दुचाकींसह ६३ हजार ३३० रुपयांची रोकड, असा एकूण ५ लाख ३० हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यांना केली अटक-
अशोक उखर्डू हिवराळे (वय ६३, रा. जामनेरपुरा, जामनेर), अक्षय प्रताप पाटील (वय २२, रा. नाथनगर, जामनेर), विकास सुरेश माळी (वय २६, रा. गणेश कॉलनी, जामनेर), अजय विठ्ठल माळी (वय ३२, रा. गणेश कॉलनी, जामनेर), शुभम संजय पाटील (वय २२, रा. नाथनगर, जामनेर), संदीप देवीदास खडके (वय ४२, रा. श्रीकृष्ण नगर, जामनेर), सतीश लक्ष्मण माळी (वय ४५, रा. गिरीजा कॉलनी, जामनेर), जहीरखान हनिफखान (वय ४८, रा. इस्लामपुरा, जामनेर), सचिन हिलाल धनगर (वय ३२, रा. शिंगाईत, ता. जामनेर), भुषण सुरेश कवळकर (वय २८, रा. जामनेरपुरा, जामनेर), किरण अनिल जाधव (वय २५, रा. सुतार गल्ली जामनेर), धनराज प्रल्हाद साबळे (वय २४, रा. जामनेरपुरा, जामनेर), अमन सुधाकर दळे (वय १८, रा. टाकळी, ता. जामनेर), उमेश दिलीप जगताप (वय ३७, रा. बजरंगपुरा, जामनेर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.