महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2024 Auction : ७२ खेळाडूंवर २३० कोटी रुपये खर्च! स्टार्क-कमिन्स मालामाल, स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड - pat cummins

IPL 2024 AUCTION : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा लिलाव दुबईतील कोका कोला एरिना स्टेडियमवर झाला. या लिलावासाठी एकूण ३३२ खेळाडूंनी नावं नोंदवली होती. त्यापैकी ७२ खेळाडू विकले गेले.

IPL 2024 AUCTION
IPL 2024 AUCTION

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 2:49 PM IST

Updated : Dec 20, 2023, 6:44 PM IST

दुबई IPL 2024 AUCTION :इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ चा लिलाव मंगळवारी (२० डिसेंबर) दुबईमध्ये झाला. या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. या लिलावात ३३२ खेळाडूंची बोली लावली. यापैकी ७२ खेळाडू विकले गेले. त्यापैकी ३० खेळाडू परदेशी होते. या ७२ खेळाडूंवर सर्व १० संघांनी तब्बल २३० कोटी आणि ४५ लाख रुपये खर्च केले.

कोणत्या संघानं किती खेळाडूंना खरेदी केलं : या लिलावात ८ संघांनी २५-२५ खेळाडूंचा कोटा पूर्ण केला आहे. कोलकाता संघात केवळ २३ खेळाडू असून, राजस्थानमध्ये २२ खेळाडू आहेत. आजच्या लिलावात मुंबई ८, चेन्नईनं ६, दिल्लीनं ९, कोलकाता १०, गुजरात ८, लखनऊ ६, पंजाब ८, राजस्थान ५, हैदराबादनं ६ आणि बेंगळुरूनं ६ खेळाडू विकत घेतले.

या दिग्गज खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही : या लिलावात अशी अनेक मोठी नावं होती ज्यांना कोणीही खरेदीदार मिळाला नाही. यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरचा समावेश आहे. स्टीव्ह स्मिथनं त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली होती, तर नायरची मूळ किंमत ५० लाख रुपये होती.

  • मनीष पांडे – 50 लाख, कोलकाता नाइट रायडर्स (मूळ किंमत – 50 लाख)
  • रिले रॉसो (दक्षिण आफ्रिका) – 8 कोटी, पंजाब किंग्स (मूळ किंमत – 2 कोटी)
  • लॉकी फर्ग्युसन (न्यूझीलंड) – 2 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (मूळ किंमत – 2 कोटी)
  • मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान) – २ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स (मूळ किंमत – २ कोटी)
  • शेरफेन रदरफोर्ड (वेस्ट इंडिज) – 1.5 कोटी, कोलकाता नाइट रायडर्स (मूळ किंमत – 1.5 कोटी)
  • अ‍ॅश्टन टर्नर (ऑस्ट्रेलिया) – १ कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (मूळ किंमत – १ कोटी)
  • टॉम कुरन (इंग्लंड) – 1.5 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (मूळ किंमत – 1.5 कोटी)
  • डेव्हिड विली (इंग्लंड) – २ कोटी रुपये, लखनौ सुपर जायंट्स (मूळ किंमत – २ कोटी रुपये)
  • स्पेन्सर जॉन्सन (ऑस्ट्रेलिया) – १० कोटी रुपये, गुजरात टायटन्स (मूळ किंमत – ५० लाख)
  • मुस्तफिजुर रहमान (बांगलादेश) – 2 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (मूळ किंमत – 2 कोटी)
  • झाय रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया) - रु 5 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (मूळ किंमत - रु 1.5 कोटी)
  • नुवान तुषारा (श्रीलंका) – ४.८ कोटी, मुंबई इंडियन्स (मूळ किंमत – ५० लाख)
  • केएस भारत - ५० लाख, कोलकाता नाइट रायडर्स (आधारभूत किंमत – ५० लाख)
  • टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी ६० लाख रुपयांना विकला गेला. त्याला गुजरात टायटन्सनं आपल्या संघात सामिल केलं. त्याची आधारभूत किंमत २० लाख रुपये होती.
  • युवायश दयालला या लिलावात मोठी किंमत मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं त्याला ५ कोटी रुपयांना खरेदी केलं. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती.
  • श्रीलंकेच्या दिलशान मदुशंकाला मुंबई इंडियन्सनं ४.६० कोटी रुपयांना खरेदी केलं. त्याची आधारभूत किंमत ५० लाख रुपये होती.
  • अनकॅप्ड शुभम दुबेला ५.८० कोटी रुपये मिळाले. राजस्थान रॉयल्सनं त्याला खरेदी केलं. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती.
  • अनकॅप्ड समीर रिझवीला चेन्नई सुपर किंग्जनं तब्बल ८.४० कोटी रुपयांना खरेदी केलं. त्याची मूळ किंमत फक्त २० लाख रुपये होती.
  • स्फोटक फलंदाज शाहरुख खानला गुजरात टायटन्सनं ७.४० कोटी रुपये देऊन खरेदी केलं. त्याची मूळ किंमत ४० लाख रुपये होती. पंजाब किंग्जनं त्याला रिलिज केलं होतं.
  • जयदेव उनाडकटला सनरायझर्स हैदराबादनं १.६० कोटी रुपयांना विकत घेतलं.
  • शिवम मावीला लखनऊ सुपर जायंट्सनं ६.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. मावीची मूळ किंमत ५० लाख रुपये होती.
  • वेगवान गोलंदाज उमेश यादवला गुजरात टायटन्सनं ५.८ कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. उमेश यादवची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • आरसीबीनं अल्झारी जोसेफला ११.५० कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. अल्झारीची मूळ किंमत १ कोटी रुपये होती.
  • चेतन सकारियाला कोलकाता नाईट रायडर्सनं ५० लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतलं.
  • केएस भरतला कोलकाता नाईट रायडर्सनं ५० लाख रुपयांना विकत घेतलं.
  • जोश इंग्लिश विकला गेला नाही.
  • ट्रिस्टन स्टब्सला दिल्ली कॅपिटल्सनं ५० लाखांच्या मूळ किमतीत त्यांच्या संघात समाविष्ट केलं.
  • ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतलं.मिचेल स्टार्कची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • इंग्लिश वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला पंजाब किंग्जनं ४.२० कोटी रुपयांना विकत घेतलं. वोक्सची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • किवी क्रिकेटर डॅरेल मिशेलला चेन्नई सुपर किंग्सनं १४ कोटींना विकत घेतलं आहे. मिशेलनं क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध दोन शतकं झळकावली होती. मिशेलची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
  • हर्षल पटेलला पंजाब किंग्जनं ११.७५ कोटी रुपयांना विकत घेतलं. हर्षल पटेलची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • कोएत्झी मुंबईकडून खेळणार आहे. जेराल्ड कोएत्झीला मुंबई इंडियन्सनं ५ कोटींना विकत घेतलं. कोएत्झीची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादनं २०.५ कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. पॅट कमिन्स हा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कमिन्सला विकत घेण्यासाठी आरसीबीनंही धडपड केली, पण सनरायझर्सनं बाजी मारली. कमिन्सची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • अजमतुल्ला उमरझाईला गुजरात टायटन्सनं ५० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केलं. अजमतुल्ला उमरझाई अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.
  • शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग्जनं ४ कोटींना विकत घेतलं. शार्दुलची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सनं १.८० कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. रवींद्रची मूळ किंमत ५० लाख रुपये होती.
  • वानिंदू हसरंगाला सनरायझर्स हैदराबादनं १.५ कोटी रुपयांना विकत घेतलं. हसरंगाची मूळ किंमतही १.५ कोटी रुपये होती.
  • ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ पहिल्या फेरीत विकला गेला नाही. स्मिथची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • हॅरी ब्रूक आयपीएलच्या पुढील हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. ट्रॅव्हिस हेडला सनरायझर्सनं ६.८० कोटी रुपयांना विकत घेतलं. हेडची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • इंग्लिश क्रिकेटर हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सनं ४ कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. ब्रूक गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. ब्रुकची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.
  • रोव्हमन पॉवेलला विकत घेण्यासाठी नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. राजस्थान रॉयल्सने पैज जिंकून पॉवेलला ७.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. पॉवेल आता राजस्थानकडून खेळणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (१९ डिसेंबर) दुबईत होतो आहे. आयपीएल लिलावासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी त्यांची नावं नोंदवण्यात आली होती. त्यापैकी ३३३ नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली. यामध्ये २१४ भारतीय आणि ११९ विदेशी खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले ११६ खेळाडू, तर २१५ खेळाडू अनकॅप्ड आहेत. लिलावात दोन खेळाडू सहयोगी देशांचेही आहेत. या लिलावाद्वारे १० संघात एकूण ७७ खेळाडू घेतले जाणार आहेत. परदेशी खेळाडूंसाठी ३० जागा राखीव असून अनेक संघांकडे प्रत्येकी ३० कोटींहून अधिक रक्कम आहे.

हेही वाचा :

  1. आयपीएल २०२४ च्या लिलावात 'या' ५ खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली
  2. हार्दिक पांड्यानं गुजरातची साथ सोडली, मुंबई इंडियन्समध्ये दाखल
  3. धोनी आयपीएल २०२४ खेळणार! बेन स्टोक्सचा होणार लिलाव; जाणून घ्या संपूर्ण यादी
Last Updated : Dec 20, 2023, 6:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details