दिल्ली संघाने यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतसाठी २ कोटी रुपये मोजले आहेत.
IPL Auction 2022 Live Updates : जाणून घ्या, कोणत्या खेळाडूची किती किंमत... - आयपीएल 2022 साठीचा लिलाव
20:51 February 12
दिल्लीने घेतला 'हा' यष्टीरक्षक
20:48 February 12
शाहबाज अहमदसाठी 'इतक्या' कोटींची बोली
शाहबाज अहमदसाठी हैदराबाद आणि बंगळुरू संघाने बोली लावली. त्यात बंगळुरूने २.४० कोटींमध्ये त्याला त्यांच्या संघात घेतले आहे.
20:46 February 12
राहुल तेवतिया ९ कोटींमध्ये गेला 'या' संघात
अष्टपैलू खेळाडू तेवतिया हा ९ कोटी रुपयांमध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळताना दिसेल.
14:09 February 12
आयपीएल 2022 साठीचा लिलाव
हैदराबाद- इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) मेगा लिलाव आजपासून सुरू झाला आहे. शिखर धवनची सर्वप्रथम बोली लावली. त्याला पंजाब किंग्जने 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. रविचंद्रन अश्विनवर दुसऱ्या क्रमांकावर बोली लावण्यात आली. त्याला राजस्थान रॉयल्सने 5 कोटींना विकत घेतले.
स्मिथ अनसोल्ड
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला.
सुरेश रैना अनसोल्ड
भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना अनसोल्ड राहिला.
पडिक्कलला राजस्थानने विकत घेतले
भारताचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलवर बोली लावण्यात आली. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये आहे. गेल्या वेळी त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० लाख रुपयांना विकत घेतले होते. यावेळी त्याला राजस्थान रॉयल्सने 7.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
डेव्हिड मिलर अनसोल्ड
डेव्हिड मिलरला कोणताही खरेदीदार सापडला नाही, तो विकला गेला नाही.
रॉयला अहमदाबादने खरेदी केले
जेसन रॉयला गुजरात टायटन्सने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये देऊन विकत घेतले. रॉय पाकिस्तान सुपर लीगमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि त्याने शतक केले होते.