हैदराबादIPL 2024 Release Retained Players :जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएल २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. रविवारी सर्व १० आयपीएल फ्रँचायझींनी रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. वाचा प्रत्येक संघानं कोणत्या खेळाडूला संघात कायम ठेवलं आणि कोणत्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला.
१) गुजरात टायटन्स :
- कायम ठेवलेले खेळाडू -हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, मोहम्मद शमी, आर साई किशोर, रााशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा आणि नूर अहमद.
- रिलीज केलेले खेळाडू -यश दयाल, शिवम मावी, केएस भरत, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, प्रदीप संगवान, दासून शनाका आणि अल्झारी जोसेफ
२)मुंबई इंडियन्स :
- कायम ठेवलेले खेळाडू - रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, डेव्हॉल्ड ब्रेविस, नेहाल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, शम्स मुलानी, जेसन बेहरेनडॉर्फ, पीयूष चावला, विष्णू विनोद, आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय.
- रिलीज केलेले खेळाडू -जोफ्रा आर्चर, जे रिचर्डसन, मोहम्मद अर्शद खान, रमणदीप सिंग, हृतिक शौकीन, राघव गोयल, ट्रिस्टन स्टब्स, डुआन यानसेन, रिले मेरेडिथ, संदीप वॉरियर आणि ख्रिस जॉर्डन
३) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :
- कायम ठेवलेले खेळाडू -फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, मयंक डागर, मनोज भडांगे, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपली हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, राजन कुमार, विल जॅक आणि विशाक विजय कुमार
- रिलीज केलेले खेळाडू -जोश हेझलवुड, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, केदार जाधव, डेव्हिड विली, मायकेल ब्रेसवेल, फिन ऍलन, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग आणि सिद्धार्थ कौल. शाहबाज अहमदला हैदराबादला ट्रेड केलं. त्याच्या जागी मयंक डागरचा संघात समावेश करण्यात आला.
४) चेन्नई सुपर किंग्ज :
- कायम ठेवलेले खेळाडू -महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, राजवर्धन हंगेकर, दीपक चहर, महिष तिक्ष्णा, तुषार देशपांडे, मिशेल सँटनर, मथिशा पाथिराना, प्रशांत सोलंकी, शेख रशीद, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू आणि अजय मंडल.
- रिलीज केलेले खेळाडू -बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, काइल जेमिसन, अंबाती रायुडू (निवृत्त), सिसंदा मगला, भगत वर्मा, आकाश सिंग आणि सुभ्रांशु सेनापती
५) दिल्ली कॅपिटल्स :
- कायम ठेवलेले खेळाडू -ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धुल, मिचेल मार्श, अक्षर पटेल, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्किया, ललित यादव, खलील अहमद, इशांत शर्मा, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे.
- रिलीज केलेले खेळाडू -सरफराज खान, मनीष पांडे, चेतन सकारिया, रोवमन पॉवेल, रिले रुसी, फिल सॉल्ट, कमलेश नागरकोटी, रिपल पटेल, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, प्रियम गर्ग