महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2023 Streaming in 12 languages : आता 12 भाषांमध्ये पाहू शकाल मोफत लाईव्ह आयपीएल; कसे ते जाणून घ्या - Indian Premier League 2023

आयपीएल 2023 चा रोमांचक सामना आता 12 भाषांमध्ये घरी बसून थेट पाहता येणार आहे. यासाठी फक्त 2GB डेटा खर्च केला जाईल. आयपीएलचे थेट प्रक्षेपण कुठे आणि केव्हा होईल घ्या जाणून.

IPL 2023 Streaming in 12 languages
आता 12 भाषांमध्ये पाहू शकाल मोफत लाईव्ह आयपीएल

By

Published : Feb 22, 2023, 12:30 PM IST

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. यावेळी जिओ सिनेमाला इंटरनेटवर आयपीएल मोफत दाखवण्याची परवानगी मिळाली आहे. आयपीएलच्या स्ट्रीमिंगसाठी जियो सिनेमा (Jio Cinema) ने अनेक नवीन फीचर्स समाविष्ट केले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये आयपीएलची उत्सुकता आणखी वाढणार आहे. आयपीएलचे थेट प्रक्षेपण आता जिओ सिनेमावर १२ भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. यासोबतच व्हिडीओचा दर्जाही चांगला दिसेल. याशिवाय स्टार स्पोर्ट्सवरही आयपीएलचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

आयपीएल पाहू शकता मोफत :बीसीसीआयकडून जियो सिनेमा (Jio Cinema) ला आयपीएलसाठी मोफत दाखवण्याची परवानगी मिळाल्यानंतर या स्पर्धेतील 74 सामने इंटरनेटवर सहज पाहता येतील. पूर्वी असे नव्हते. हॉटस्टारवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना प्रीमियम प्लॅन खरेदी करावा लागत होता. यासोबतच सामना एचडी दर्जात दाखवण्यासाठी पैसे खर्च करावे लागले. पण आता तुम्ही जिओ सिनेमावर आयपीएल मोफत पाहू शकता. यासाठी मोबाईलवर फक्त 2 जीबी डेटा खर्च होईल, ज्यासाठी लोकांना 28 रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, Airtel, Vodafone आणि Jio डेटा ऑपरेटर देखील IPL साठी विशेष रिचार्ज प्लॅन आणू शकतात.

12 भाषांमध्ये होणार प्रसारण :आयपीएलचे 12 भाषांमध्ये प्रसारण होणार आहे. आयपीएल 2023 चा रोमांचक सामना 12 भाषांमध्ये घरी बसून थेट पाहता येणार आहे. भारतातील क्रिकेट सामन्यांचे प्रसारण बहुतांशी हिंदी, इंग्रजी, तेलुगू, पंजाबी आणि तामिळ भाषांमध्ये होते. पण यावेळी आयपीएल 2023 ची स्पर्धा मराठी, गुजराती, भोजपुरी, ओडिया, तेलुगू तमिळ आणि कन्नड भाषांसह सुमारे 12 भाषांमध्ये पाहता येणार आहे. यासाठी जिओ सिनेमाने मेट्रो शहरांमधील सुमारे 3 लाख सोसायट्या, 10 हजार महाविद्यालये आणि 25 हजार रेस्टॉरंटशी करार केला आहे. एवढेच नाही तर या मेट्रो शहरांमध्ये फॅन पार्क तयार केले जातील. ज्यामध्ये एलईडी आणि मोठ्या टीव्ही स्क्रीनवर आयपीएलचे ऑनलाइन प्रसारण केले जाईल. जियोने आयपीएलचे डिजिटल मीडिया अधिकार 20,500 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. स्टार नेटवर्कने 23,575 कोटी रुपयांना आयपीएलचे टीव्ही हक्क विकत घेतले आहेत. स्टार स्पोर्ट्स 1 आणि 3 वर आयपीएलचे थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनवर केले जाईल.

हेही वाचा :International Cricket Match Records : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात नवीन रेकाॅर्ड बनवणार टीम इंडिया; पाहा यावरील खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details