पुणे: आयपीएलच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली असून यातील चार सामने पार पडले आहेत. मंगळवारी या स्पर्धेतील पाचवा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad ) संघात खेळला जाणार आहे. यंदा राजस्थान रॉयल्स संघात युझवेंद्र चहलचा ( Spinner Yuzvendra Chahal ) समावेश आहे. मागील वर्षीपर्यंत तो आरसीबी संघाचा भाग होता. यंदा मात्र त्याला आरसीबी संघाने रिटेन केले नाही. आता या संघाबद्दल फिरकीपटू युझवेंद्र चहलने मोठा खुलासा केला आहे.
टायम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal on RCB ) म्हणाला, मी भावनात्मकरित्या आरसीबी संघासोबत जोडला गेलो आहे. मी कधी हा विचार देखील केला नव्हता की, मी आरसीबी संघा व्यतिरिक्त इतर कोणत्या संघाकडून कधी खेळेल. आज ही सोशल मीडियावर लोकं आणि चाहते मला विचारतात की, तुम्ही इतके पैसे का मागितले? खरं तर वास्तविकता अशी आहे की, माईक हेसन (RCB क्रिकेट संचालक) यांनी मला फोन केला आणि म्हणाला (कोहली, सिराज, मॅक्सवेल) ऐका युजी तीन रिटेन्शन आहेत.
चहल म्हणाला की, मला रिटेन करण्याबाबत किंवा टिकवून ठेवण्याबाबत विचारण्यात आलेला नाही. त्यांनी कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंची नावे सांगितली आणि आम्ही तुमच्यासाठी लिलावात जाऊ असे सांगितले. मला ना रिटेनबाबत विचारले गेले, ना पैशाबद्दल. मी माझ्या बंगळुरूच्या चाहत्यांशी नेहमीच एकनिष्ठ राहीन. बाकी काहीही असो, मी त्यांच्यावर नेहमीच प्रेम करेन.