महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 SRH vs RR: सामना दर सामना रणनीती बनवणार - संजू सॅमसन - captain sanju samson

पुणे येथे एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) संघावर 61 धावांनी विजय मिळवला. सामना संपल्यानंतर बोलताना संजू सॅमसन म्हणाला, तो म्हणाला, त्याचा संघ दीर्घकालीन रणनीती बनवत नाही. ते एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

IPL
IPL

By

Published : Mar 30, 2022, 8:21 PM IST

पुणे: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad ) संघात आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा सामना मंगळवारी पार पडला. हा सामना पुणे येथे एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स सनरायझर्स हैदराबाद संघावर 61 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने ( captain sanju samson ) आपल्या सामन्यांच्या रननितीबद्दल एक वक्तव्य केले. तो म्हणाला, त्याचा संघ दीर्घकालीन रणनीती बनवत नाही. ते एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत.

सनराझर्स हैद्रबाद ( Sunrisers Hyderabad ) संघावर विजय मिळवल्यानंतर संजू सॅमसनला त्याच्या रणनीतीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ''ही एक वेगळ्या प्रकारची खेळपट्टी होती. आम्हाला अशा खेळपट्टीची अपेक्षा नव्हती. तसेच वेगवान गोलंदाजांना मदत होत होती.''

संजू सॅमसन पुढे म्हणाला, 'कोणतेही दीर्घकालीन ध्येय नाही. आम्हाला जास्तीत जास्त सामने जिंकायचे आहेत आणि एका वेळी फक्त एकाच सामन्याचा विचार करत आहोत. आक्रमक अर्धशतक झळकावणाऱ्या सॅमसनने आपल्या कामगिरीबद्दल सांगितले की, 'मी माझ्या फिटनेसवर काम करत आहे, परिस्थिती आणि धावा करण्याच्या पद्धती समजून घेत आहे. मला जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवायचा आहे. आमच्याकडे चांगली टीम आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करू.

कुमार संगकाराबद्दल बोलताना संजू सॅसमन ( Sanju Samson on Kumar Sangkara ) म्हणाला, ''संगकारासारख्या लिडर्समुळे मला खूप मदत मिळाली. योग्य बाजू निवडण्यासाठी तुम्हाला क्रिकेटविषयी खूप ज्ञान असावे लागते. या हंगामात आमचे खूप मोठी स्वप्न आहेत. आमचे मालक आमची खूप काळजी घेत आहेत. आमच्याकडे खूप चांगली बेंच स्ट्रेंथ आहे आणि आम्ही एका वेळी एका सामन्यावर लक्ष देऊ.''

राजस्थान रॉयल्स संघाचा पुढील सामना सात दिवसानंतर होणारा आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध खेळला जाणार आहे. दोन्ही संघातील हा सामना 5 एप्रिलला मुंबई येथील वानखेडे स्टोडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल.

हेही वाचा-IPL 2022 Updates: मिचेल मार्शच्या आयपीएल सहभागाबद्दल महत्वाची माहिती; 'या' तारखेला दिल्ली कॅपिटल्स सोबत जोडला जाणार

ABOUT THE AUTHOR

...view details