महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Updates :...म्हणून दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाला वगळले, धोनीने केला खुलासा

डी. व्हाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जात आहे. या सामन्यात स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला ( All-rounder Ravindra Jadeja ) विश्रांती देण्यात आली आहे. यावर महेंद्रसिंग धोनीने नाणेफेकी दरम्यान खुलासा ( Mahendra Singh Dhoni revelation ) केला.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

By

Published : May 8, 2022, 10:28 PM IST

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 55 वा सामना रविवारी (8 मे) डी. व्हाय पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Chennai Super Kings vs Delhi Capitals ) संघात खेळला जात आहे. या सामन्यात स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला ( All-rounder Ravindra Jadeja ) विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याच्या जागी शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. रविंद्र जडेजाला विश्रांती या सामन्यात का विश्रांती देण्यात आली आहे, यावर महेंद्रसिंग धोनीने नाणेफेकी दरम्यान खुलासा ( Mahendra Singh Dhoni's revelation ) केला.

नाणेफेकी दरम्यान सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( CSK captain Mahendra Singh Dhoni ) म्हणाला की, ''आमची गोलंदाजी पाहता आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. नाणेफेक आपल्या हातात नाही. हा हंगाम आमच्यासाठी वाईट गेला आहे. जेव्हा मोठ्या लिलावानंतर गोष्टी बदलतात, तेव्हा काहीवेळा तुम्हाला सर्वोत्कृष्ट संयोजन काय आहे हे पाहण्याची आवश्यकता असते. जड्डू तंदुरुस्त नसल्याने दुबेला संघात स्थान देण्यात आले आहे.''

विशेष म्हणजे रवींद्र जडेजासाठी हा मोसम खास राहिला नाही. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. याशिवाय कर्णधारपदावरही जडेजासाठी हा मोसम खराब होता. संघाने सहा सामने गमावल्यानंतर जडेजाने कर्णधारपद सोडले ( Ravindra Jadeja resigns as captain ). यानंतर महेंद्रसिंग धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने एक सामना जिंकला तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. जडेजाला चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फॉर्म पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्ससमोर ( CSK vs DC ) विजयासाठी 209 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम खेळताना सीएसकेने 20 षटकात 6 बाद 208 धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने सलग तिसरे अर्धशतक झळकावले आणि 49 चेंडूत 87 धावांची शानदार खेळी खेळली.

हेही वाचा -IPL 2022 RCB VS SRH : आरसीबीचा एसआरएचवर 67 धावांनी मोठा विजय; हैदराबादच्या राहुल त्रिपाठीची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ

ABOUT THE AUTHOR

...view details