मुंबई:गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore) संघात गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील 67 वा सामना खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने गुजरातवर 8 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर आपल्या प्लेऑफमध्ये जाण्याचा आशा जिवंत ठेवल्या. तसेच आरसीबीसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचा स्टार खेळाडू विराट कोहली ( Star Player Virat Kohli ) फॉर्ममध्ये परतला आहे
कोहलीने गुरुवारी गुजरात टायटन्सविरुद्ध 54 चेंडूत 73 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. ही खेळी कोहली आणि त्याच्या संघासाठी खास होती. कारण आरसीबी ( Royal Challengers Bangalore ) प्लेऑफच्या शर्यतीत आहे. विराट कोहलीला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यानंतर आरसीबीच्या माजी कर्णधाराने मागील अवघड पॅच दरम्यान स्वत:ला कसे सावरले याबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने गुजरातविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी त्याने नेटमध्ये 90 मिनिटे फलंदाजीचा सराव केला हे देखील उघड केले.
आपल्या आकड्यांमुळे तो निराश नसून या मोसमात संघाच्या विजयात योगदान देऊ शकला नसल्यामुळे, तो नाराज असल्याचेही कोहली म्हणाला. सामना संपल्यानंतर विराट कोहली म्हणाला, 'हा एक महत्त्वाचा सामना होता. मी निराश झालो कारण मी माझ्या संघासाठी काहीही करू शकलो नाही आणि त्यामुळेच मला त्रास झाला, आकडेवारीचा नाही. आजच्या सामन्यात मी संघासाठी योगदान दिले आणि संघाला चांगल्या स्थितीत आणले. तुमचा दृष्टीकोन योग्य ठेवायला हवा. अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रक्रिया विसरू शकता. मी खूप मेहनत घेतली. मी काल नेटमध्ये 90 मिनिटे फलंदाजीचा सराव केला ( Batting Practiced 90 minutes in nets ). मी कोणत्याही दबावाशिवाय मैदानात उतरलो होतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या फलंदाजाने सांगितले की, वाईट काळात चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. कोहलीने कबूल केले की, या मोसमात त्याला अतिरिक्त पाठिंबा मिळाला, जो तो यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. 33 वर्षीय विराट कोहली म्हणाला, 'मी जे काही साध्य केले आहे, त्यावर माझा विश्वास नसता तर मी येथे उभा राहिला नसतो. शमीचा पहिल्या चेंडूवर शॉट मारल्यानंतर मला जाणवले की मी क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावर लेंथचा चेंडू मारू शकतो. मला माहित होते की, आजची रात्री मी मुक्तपणे खेळू शकतो. मला या मोसमात खूप पाठिंबा मिळाला, जो खूप छान आहे. मी याआधी कधीही न पाहिलेल्या सर्वांच्या प्रेमाबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन.'
हेही वाचा -Ipl 2022 Rr Vs Csk : राजस्थान रॉयल्स समोर आज चेन्नईच्या किंग्जचे आव्हान; राजस्थानसाठी विजय महत्वाचा