मुंबई: मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या उर्वरीत हंगामासाठी संघात डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सच्या ( Fast bowler Tymal Mills ) जागी दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू ट्रिस्टन स्टब्सचा समावेश केला आहे. दुखापतीमुळे मिल्स ( Tymal Mills injured ) उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
ट्रिस्टन स्टब्स हा दक्षिण आफ्रिकेचा 21 वर्षीय युवा यष्टिरक्षक ( Young wicketkeeper Tristan Stubbs ) आहे. त्याने 17 टी-20 सामने खेळले आहेत आणि 157.14 च्या स्ट्राइक रेटने तीन अर्धशतकांसह 506 धावा केल्या आहेत. तो 20 लाख रुपयात मुंबई संघात दाखल होण्यास तयार झाला आहे.
21 वर्षीय प्रतिभावान ट्रिस्टन स्टब्स मधल्या फळीतील फलंदाजाने अलीकडेच झिम्बाब्वे विरुद्ध राष्ट्रीय दक्षिण आफ्रिका अ संघाकडून पदार्पण केले. ट्रिस्टनचा देशांतर्गत हंगाम आश्वासक होता आणि त्याने नुकत्याच संपलेल्या टी-20 देशांतर्गत लीगमध्ये त्याच्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रिस्टन उर्वरित हंगामासाठी एमआय संघात लवकरच सामील होईल.