मुंबई:आयपीएलच्या पंधाराव्या हंगामातील 24 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला जात आहे. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात, गुजरात टायटन्सने कर्णधार हार्दिक पंड्या (नाबाद 87) ( Hardik Pandya ) आणि अभिनव मनोहर (43) यांच्या धडाकेबाज खेळी केली. या दोघांनी 55 चेंडूत 86 धावांची शानदार भागीदारी केली. ज्यामुळे राजस्थान रॉयल्सला ( Rajasthan Royals ) 193 धावांचे मिळाले आहे. राजस्थानकडून युजवेंद्र चहल, कुलदीप सेन आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला येताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. ज्यामध्ये त्यांनी पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावून 42 धावा केल्या. यादरम्यान सलामीवीर मॅथ्यू वेड (12) आणि विजय शंकर (2) यांनी विकेट गमावल्या. शुबमन गिल आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांनी शानदार फलंदाजी करत 6.3 षटकात संघाची धावसंख्या 50 च्या पुढे नेली. पण गिल (13) परागच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायर झेल घेतल्याने बाद झाला.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या अभिनव मनोहरने कर्णधार पंड्याला चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 10 षटकांत 3 गडी गमावून 72 धावांवर नेली. मात्र मधल्या षटकांमध्ये दोघांनीही जोरदार फलंदाजी केली आणि 12.5 षटकांत संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. दरम्यान, कर्णधार हार्दिकने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण 16 वे षटकांत मनोहर 28 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावा करून झेलबाद झाला. यासह त्याच्या आणि कर्णधार हार्दिकमधील 55 चेंडूत 86 धावांची भागीदारीही संपुष्टात आली. तोपर्यंत गुजरातने चार गड्यांच्या मोबदल्यात 139 धावा केल्या होत्या.
कर्णधारासह सहाव्या स्थानावर आलेल्या डेव्हिड मिलरने शेवटच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी केली आणि 19व्या षटकात सेनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवताना 21 चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि 21 धावा केल्या. 20 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध कृष्णाने 12 धावा दिल्या, त्यामुळे गुजरातने 20 षटकात 4 गडी गमावून 192 धावा केल्या. कर्णधार हार्दिक (87) आणि मिलर (31) यांनी 25 चेंडूत 53 धावांची नाबाद भागीदारी केली. आता राजस्थानला विजयासाठी 193 धावा कराव्या लागणार आहेत.
हेही वाचा -Sri Lanka women Team : श्रीलंकंन महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, असं असेल संपूर्ण वेळापत्रक