मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा ( Fifteenth season of IPL ) बिगुल 26 मार्चला वाजला आहे. आतापर्यंत या स्पर्धेत प्रत्येक संघाचा एक सामना खेळला गेला आहे. तसेच आयपीएल स्पर्धेचा पाचवेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात नेहमीप्रमाणे खराब झाली. ज्यात त्यांना आपल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. परंतु आता याच मुंबई इंडियन्स संघासाठी आनंदाची बातमी ( Good news for Mumbai Indians ) समोर आली आहे. या संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरला आहे. त्याचबरोबर तो मुंबई संघाशी जोडला गेला आहे.
सुर्यकुमार यादवचे संघात पुनरागमन -मुंबई इंडियन्स संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव ( Batsman Suryakumar Yadav ) बोटाच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर, अनिवार्य क्वारंटाइन कालावधी पूर्ण करुन संघाच्या बायो-बबलमध्ये सामील झाला आहे. यादवने बुधवारी मुंबई इंडियन्सच्या इतर स्टार्ससह ताकद आणि कंडिशनिंग सत्रात भाग घेतला होता. आता तो शनिवारी (२ एप्रिल) डीवाय पाटील स्टेडियमवर ( DY Patil Stadium ) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमारला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू होते. आता तो नुकताच दुखापतीतून सावरला आहे.