मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 28 वा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद ( Punjab Kings vs Sunrisers Hyderabad ) संघात दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेकीचा कार्यक्रम पार पडला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसनने ( Captain Ken Williamson ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पंजाब किंग्ज संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आज मयंक अग्रवाल ऐवजी शिखर धवन ( Shikhar Dhawan ) नाणेफीकीसाठी आला होता. कारण मयंक अग्रवाल दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नाही.
पंजाब किंग्ज संघाने ( Punjab Kings Team ) आतापर्यंत आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तसेच हा संघ सहा गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी विराजमान आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad Team ) संघाने देखील आपले पाच सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पहिल्या दोन सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर संघाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. त्यामुळे हा संघ सातव्या स्थानी आहे.
पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद मधील आकडेवारी -
1. हेड हू हेड स्टॅट्समध्ये सनरायझर्स हैदराबादचा पंजाब किंग्जविरुद्ध वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत हैदराबादने 18 सामने जिंकले आहेत, तर पंजाबने 6 सामने जिंकले आहेत.
2. डेव्हिड वॉर्नरने पंजाब किंग्जविरुद्ध 945 धावा केल्या आहेत. मात्र, या मोसमात तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग नाही. तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.